coronavirus: गेल्या चार महिन्यांत राज्याात रिचवले गेले १५०९ लाख लीटर मद्य !

By अतुल कुलकर्णी | Published: August 31, 2020 07:23 AM2020-08-31T07:23:15+5:302020-08-31T07:23:25+5:30

हाताला काम नाही, खिशात दाम नाही, तरीही ३९०० कोटी रुपये दारूवर खर्च

coronavirus: 1509 lakh liters of liquor has been stored in the state in the last four months! | coronavirus: गेल्या चार महिन्यांत राज्याात रिचवले गेले १५०९ लाख लीटर मद्य !

coronavirus: गेल्या चार महिन्यांत राज्याात रिचवले गेले १५०९ लाख लीटर मद्य !

googlenewsNext
ठळक मुद्देhttp://cms.lokmat.com/admin/workbench

- अतुल कुलकर्णी
मुंबई : लॉकडाऊनच्या गेल्या चार महिन्यात तळीरामांचे घसे कोरडे पडलेच नाहीत. या काळात तब्बल ३९०० कोटी रुपयांच्या देशी, विदशी दारु आणि बियरने हजारोंची साथसंगत केली. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात १५०२.५२ लाख लिटर दारुने अनेकांचे घसे ओले केले. २०१९ मध्ये याच चार महिन्यात मद्यप्रेमींनी ३१४८.२५ लाख लिटर दारुने आपली तहान भागवली होती हे विशेष.

‘हाताला काम नाही, शिखात दाम नाही, असे चित्र राज्यभर असतानाच्या काळात ३९०० कोटी रुपयांची दारु विकली जाण्याचा पराक्रम महाराष्ट्राच्या नावावर जमा तर केलाच शिवाय, या सगळ्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेत चार महिन्यात २३६२.१३ कोटी रुपये महसुलापोटी जमा करुन राज्याच्या विकासाला हातभार लावण्याचे काम केले आहे. राज्याची अर्थव्यवस्था संकटात असताना १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यात देशी दारु पिणाऱ्यांनी ६८२.२८ कोटी, विदेशी प्रेमींनी १५६८.६३ कोटी आणि बियर प्रेमींनी १११.२३ कोटी रुपयांचा असा एकूण २३६२.१३ कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला. ‘‘अर्थव्यवस्था वाचवण्याचे कामही आम्हालाच करावे लागत आहे’’ असे मिम्स या काळात खूप व्हायरल झाले होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्यावर्षी २०१९-२० मध्ये राज्याच्या तिजोरीत १५,४२८ कोटींचा मिळवून दिले होते. यावर्षी मात्र हे प्रमाण खूप कमी झाले आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात ४८७५.२७ कोटी रुपये अबकारी करापोटी विभागाने जमवले होते. यावेळी मात्र त्याच्या अर्धेच पैसे जमा होऊ शकले असे विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: 1509 lakh liters of liquor has been stored in the state in the last four months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.