Coronavirus: मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 08:03 AM2020-04-28T08:03:33+5:302020-04-28T08:05:39+5:30

मुंबईत अडकलेल्या एका तरुणाला खाण्या-पिण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्याने त्याने चक्क मुंबईहून गावाकडे पायी जाण्याचा मार्ग निवडला. उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणाने

Coronavirus: 1600 km walking from Mumbai, death within hours of reaching the village in uttar pradesh MMG | Coronavirus: मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना

Coronavirus: मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना

googlenewsNext

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मे रोजी संपला तरी निदान कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी तरी त्यानंतरही निर्बंध सुरू राहावेत, अशा मतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पं. बंगाल, पंजाब, ओदिशा व दिल्ली ही सहा राज्ये आली असल्याची माहिती मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे अन् राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. कारण, या मजूरांना त्यांच्या गावी जायचं असल्याने लॉकडाऊन संपण्याची वाट ते पाहात आहेत. तर, अनेकजण जमेल तर गावी जायचा प्रयत्न करत आहेत. मुंबईहून एका मजुराने चक्क १६०० किमीचा प्रवास करुन आपलं गाव गाठलं. पण, याचा शेवट अतिशय दु:खद अन् दुर्दैवी झाला. 

मुंबईत अडकलेल्या एका तरुणाला खाण्या-पिण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्याने त्याने चक्क मुंबईहून गावाकडे पायी जाण्याचा मार्ग निवडला. उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणाने बहराईचमार्गे तब्बल १६०० किमीचा टप्पा पार चालत पूर्ण केला. मात्र, गावी पोहोचल्यानंतर केवळ ४ तासातच या युवकाने अखरेचा श्वास घेतला. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांना माहिती मिळताच, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबईहून गावी आलेल्या या युवकाला, गावी पोहोचताच एका सरकारी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ४ तासातच त्याने आपले प्राण सोडले. या घटनेने जिल्हा प्रसाशनात खळबळ उडाली. तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण न समजल्याने त्याचे स्वॅब घेण्यात आले असून ते कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या चाचणीचा अहवाल येईलपर्यं मृतदेहास रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहे. 

मल्हीपूर ठाण्यातील मटनखवा या आपल्या मूळगावी हा युवक आला होता, त्यावेळी प्राथमिक विद्यालयात यास क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यावेळी, क्वारंटाईन कक्षातच पोटदुखी अन् उलटीचा त्रास युवकाला सुरु झाला. त्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीनंतर, मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन एवढ्यात संपेल असे वाटत नाही. कदाचित, त्यामुळेच, सामनाच्या अग्रलेखातून आज परप्रांतीय मजूरांच्या व्यवस्थेबद्दल केंद्र सरकारला जाब विचारण्यात आला आहे. 

Web Title: Coronavirus: 1600 km walking from Mumbai, death within hours of reaching the village in uttar pradesh MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.