Join us

Coronavirus: १६९ कोरोना रुग्ण सापडल्याची अफवा; मेसेज व्हायरल करणाऱ्यावर होणार गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 4:26 AM

यामुळे कुरार परिसरात खळबळ उडाली होती. त्यानुसार या ठिकाणी राहणाºया आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना लोकांनी फोन करण्यास सुरुवात केली.

मुंबई : मालाडच्या कुरार परिसरात एका इमारतीमध्ये १६९ कोरोना रुग्ण सापडल्याच्या व्हायरल पोस्टने खळबळ उडाली होती. मात्र नंतर ही अफवा असून असा प्रकार करणाºया विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.मालाडच्या ओमकार इमारतीत १६९ स्थानिक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचा मेसेज मंगळवार सकाळपासून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता.

यामुळे कुरार परिसरात खळबळ उडाली होती. त्यानुसार या ठिकाणी राहणाºया आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना लोकांनी फोन करण्यास सुरुवात केली. यासोबत एक फोटोही शेअर करण्यात आला होता. ज्यात १५ ते २० लोक पीपीई किट घालून इमारतीसमोर उभे आहेत, तसेच त्याच्या शेजारी रुग्णवाहिका आणि बस उभी असल्याचेही दिसत होते. त्यामुळे लोकांचा या मेसेजवर सहज विश्वास बसला. मात्र अखेर याप्रकरणी पोलिसांना विचारणा करण्यात आली. तेव्हा तो ‘फेक’ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मालाडमध्ये ओमकार इमारतीत पालिकेच्या कर्मचाºयांनी २७ जून, २०२० रोजी स्क्रिनिंग केले होते. त्यात ५ ते ६ जण कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले. तर त्यांचे कुटुंबीय तसेच संपर्कात आलेले लोक अशी एकूण संख्या घेत पथकाचा हा फोटो कुणीतरी काढला व तो चुकीची माहिती देत पसरवला,’ असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.गुन्हा दाखल करणार!फोटोसोबत चुकीची माहिती व्हायरल करून अफवा पसरवत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाºया विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आमच्या वरिष्ठांकडून देण्यात आले असून, आम्ही याचा तपास करीत आहोत. - बाबासाहेब साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस ठाणे

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिस