Coronavirus : १७ होम क्वारंटाइन केलेल्या प्रवाशांना तक्रारीमुळे पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:50 AM2020-03-20T07:50:32+5:302020-03-20T07:50:57+5:30

सिंगापूरहून मुंबई विमानतळावर सहा जण आले होते. त्यांची विमानतळावर तपासणी केली असता, कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा (घरगुती अलगीकरण) शिक्का मारण्यात आला होता.

Coronavirus: 17 Home quarantined passengers caught due to complaint | Coronavirus : १७ होम क्वारंटाइन केलेल्या प्रवाशांना तक्रारीमुळे पकडले

Coronavirus : १७ होम क्वारंटाइन केलेल्या प्रवाशांना तक्रारीमुळे पकडले

Next

मुंबई : कोरोनाविषयी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवासी विशेष काळजी घेत आहेत. यात गुरुवारी पश्चिम रेल्वेने १७ होम क्वारंटाइन प्रवाशांना पकडले. त्यानंतर या प्रवाशांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने जिल्हा पातळीवरील संबंधित विभागाकडे सोपविले.
सिंगापूरहून मुंबई विमानतळावर सहा जण आले होते. त्यांची विमानतळावर तपासणी केली असता, कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा (घरगुती अलगीकरण) शिक्का मारण्यात आला होता. विमानतळावरून त्यांना बडोदा येथे जायचे होते. त्यासाठी त्यांनी गुरुवारी सकाळी ८.२० वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून सौराष्ट्र एक्स्प्रेस पकडली.
प्रवासात इतर प्रवाशांकडून कोरोनाग्रस्त संशयित प्रवास करत असल्याची चर्चा झाली. अन्य प्रवाशांनी घेतलेल्या आक्षेपानंतर
बोरीवली स्थानकात सिंगापूरहून आलेल्या सहा प्रवाशांना
उतरविण्यात आले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने त्यांना जिल्हा पातळीवरील संबंधित विभागाकडे सोपविले.
थायलंडहून आलेल्या पाच होम क्वारंटाइन प्रवाशांना कुच एक्स्प्रेसमधून प्रवास करताना पकडले. तर, दुबई आणि फ्रान्समधून आलेल्या प्रत्येकी तीन होम क्वारंटाइन प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसमधून पकडण्यात आले. या प्रवाशांना सुरत येथे उतरवून जिल्हा पातळीवरील संबंधित विभागाकडे सोपविले. तर, अवंतिका एक्स्प्रेसमधून एका होम क्वारंटाइन प्रवाशाला मुंबई सेंट्रल येथे पकडल्याची आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: Coronavirus: 17 Home quarantined passengers caught due to complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.