Join us

coronavirus: राज्यात दिवसभरात तब्बल १७,४३३ रुग्ण, आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:13 AM

राज्यातील एकूण रुग्ण संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ८ लाख २५ हजार ७३९ झाली आहे. तर बळींचा आकडा २५,१९५ वर पोहोचला.

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्याभरात दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख चढता आहे. राज्यात बुधवारी १७ हजार ४३३ रुग्णांचे निदान झाले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्णनिदान आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे २९२ मृत्यू झाले. परिणामी, राज्यातील एकूण रुग्ण संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ८ लाख २५ हजार ७३९ झाली आहे. तर बळींचा आकडा २५,१९५ वर पोहोचला. राज्यात सध्या २ लाख १ हजार ७०३ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात दिवसभरात १३ हजार ९५९ रुग्ण दिले असून आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के झाले असून मृत्युदर ३.०५ टक्के झाला आहे.मराठवाड्यात ८९४ रुग्ण वाढलेमराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या ८९४ रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात ३१५, जालना जिल्ह्यात २२६, उस्मानाबाद जिल्ह्यात २०४, बीड जिल्ह्यात ११७, हिंगोली जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. तर जालना जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला.मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा वाढमुंबईत पुन्हा दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येतेय. शहर, उपनगरात दिवसभरात १,६२२ रुग्ण आणि ३४ मृत्यूंची नोंद झाली. चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधीत घट होत आहे. हा कालावधी आता ७६ दिवसांवर आला आहे. सध्या मुंबईत २०,८१० सक्रिय रुग्ण असून एकूण रुग्ण संख्या १ लाख ४८ हजार ५६९ झाली असून मृतांचा आकडा ७,७२७ आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्के आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई