CoronaVirus : मुंबईत आतापर्यंत १७५३ लोकांना कोरोनाची लागण, हॉटस्पॉट सात वरून पाचवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:33 PM2020-04-14T19:33:56+5:302020-04-14T20:21:29+5:30

CoronaVirus : मुंबईत आतापर्यंत १७५३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus: 1753 people infected with Corona In Mumbai , hotspots in five rkp | CoronaVirus : मुंबईत आतापर्यंत १७५३ लोकांना कोरोनाची लागण, हॉटस्पॉट सात वरून पाचवर

CoronaVirus : मुंबईत आतापर्यंत १७५३ लोकांना कोरोनाची लागण, हॉटस्पॉट सात वरून पाचवर

Next

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने हॉटस्पॉटच्या निकषांमध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे. नव्या निकषानुसार ८५ हून अधिक रुग्ण सापडलेल्या विभागाला अतिसंवेदनशील हॉटस्पॉट ठरविण्यात आले आहे. यामुळे हॉटस्पॉटची संख्या आता सातवरुन पाचवर आली आहे. 

मुंबईत आतापर्यंत १७५३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीपासूनच वरळी, धारावी विभागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उपनगरातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे मुंबईत सात ठिकाणं अति गंभीर ठरली होती. परंतु, गंभीरता वाढत असल्याने पालिकेने आता आपल्या निकषांमध्ये बदल करीत बचाव सुरू केला आहे.

आतापर्यंत ५० पेक्षा अधिक रुग्ण असल्यास अतिगंभीर विभाग समजला जात होता. आता मात्र ८५ पेक्षा अधिक कोरोना बाधित  रुग्ण सापडल्यास तो विभाग अतिगंभीर’ समजण्यात येणार आहे. 
सध्या ३० ते ५० कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या असलेल्या विभागास ‘गंभीर’ समजण्यात येत होते, आता ५० ते ८४ असा नवा निकष केला आहे. त्यामुळे गंभीर स्थिती असलेल्या विभागांची संख्या आठवर नेण्यात आली आहे. 

हे आहेत अति गंभीर हॉट स्पॉट...
जी दक्षिण –  वरळी, लोअर परळ, करी रोड – ३०८

ई – भायखळा, रे रोड, वाडीबंदर -१२५

डी- मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – १०७

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – ८६

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – ८५

Web Title: CoronaVirus: 1753 people infected with Corona In Mumbai , hotspots in five rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.