coronavirus: राज्यात कोरोनाचे २ लाख १७ हजार १२१ रुग्ण, दिवसभरात २२४ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:12 AM2020-07-08T07:12:11+5:302020-07-08T07:12:34+5:30
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०६ टक्के झाले असून, मृत्युदर ४.२६ टक्के आहे. सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : राज्यात दिवसभरात ५ हजार १३४ रुग्णांची नोंद झाली असून, २२४ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार १२१ झाली असून, बळींचा आकडा ९ हजार २५० झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०६ टक्के झाले असून, मृत्युदर ४.२६ टक्के आहे. सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात मंगळवारी २२४ मृत्युंची नोंद झाली. त्यात मुंबई ६४, ठाणे ७, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी- निजामपूर मनपा ३ रुग्ण आहेत. शिवाय मीरा-भार्इंदर मनपा ११, पालघर २, वसई-विरार मनपा ८, पनवेल मनपा ९, नाशिक ४, नाशिक मनपा ९, अहमदनगर १, धुळे १, धुळे मनपा १, जळगाव ५, जळगाव मनपा ३, पुणे ९, पुणे मनपा २७, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ३, सोलापूर मनपा ७, सातारा १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, लातूर २, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, यवतमाळ २ या रुग्णांचाही समावेश आहे.
मुंबईत आणखी ६४ बळी
मुंबईत मंगळवारी ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांपैकी पाच जण ४० वर्षांखालील होते. ४० जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. उर्वरित १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ६७ टक्क्यांवर आला आहे. २९ जून ते ६ जुलैपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर १.५८ टक्क्यांवर आला आहे.
रुग्णालयात दाखल ९० टक्के रुग्ण लक्षणेविरहित
राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे दिसून आले आहे, तर केवळ ६ टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या ४ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालात नमूद आहे.