मुंबई - देशात सध्या काेराेनाचे ४ लाख ९ हजार ६८९ सक्रिय रुग्ण आहेत, शनिवारी या संख्येत ६ हजार ३९३ने घट दिसून आली. जागतिक स्तराच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण देशात २.१७ टक्के आहे. देशपातळीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक ८४ हजार ९३८ सक्रिय रुग्ण असून हे प्रमाण २१ टक्के आहे. केरळ राज्यात हे प्रमाण १५ टक्के असून ही संख्या ६१ हजार ५३५ आहे.दिल्लीत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही तेथील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ७ टक्के म्हणजे येथे २८ हजार २५२ सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ पाच राज्यांमध्ये दिसून येत असून यात महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहेसर्वाधिक पॉझिटिव्हीटी प्रमाण महाराष्ट्र (१६.५५ टक्के), गोवा (१३.६१ टक्के), चंडीगढ (११.९६ टक्के), नागालँड (९.९ टक्के) आणि केरळ (९.६३ टक्के) असल्याची नोंद आहे.देशात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांचे प्रमाण शुक्रवारच्या बाधित रुग्णांच्या ४.४४ वरून ४.३५ टक्क्यांपर्यंत घसरले. गेल्या २४ तासांत नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या अधिक नोंदवली गेली.दिवसभरात ५,८३४ रुग्ण कोरोनामुक्तराज्यात शनिवारी ५,८३४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १७ लाख १५ हजार ८८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ टक्क्यांवर असून मृत्युदर २.५८ आहे. सध्या ८२,८४९ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ४,९२२ रुग्णांचे निदान झाले असून, ९५ मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार ६९४ आहे.
coronavirus: देशातील काेराेनाचे २१% सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 6:09 AM