Coronavirus News: पुढील आठवड्यापासून एसटीच्या अतिरिक्त २५० बस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 09:06 PM2020-06-06T21:06:53+5:302020-06-06T21:08:02+5:30

१४२ बस मंत्रालय, १५ बस महापालिका भवन मार्गावर धावणार

coronavirus 250 additional ST buses will run from next week | Coronavirus News: पुढील आठवड्यापासून एसटीच्या अतिरिक्त २५० बस धावणार

Coronavirus News: पुढील आठवड्यापासून एसटीच्या अतिरिक्त २५० बस धावणार

Next

मुंबई : पुढील आठवड्यापासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीने अतिरिक्त २५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बस पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून  धावणार असून, पैकी १४२ बस मंत्रालय, १५ बस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत.  उर्वरित बस  मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावतील.

अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ४०० बस धावत आहेत. यामध्ये आणखी २५० बसची भर पडणार आहे. या सर्व बस योग्य रीतीने सॅनिटाराईज केलेल्या असतील. प्रवासात फिजिकल डिस्टंनसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून  मुंबईत  अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी ,मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल ४०० बसद्वारे दररोज ८०० पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज सुमारे १४-१५ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखीन जादा बसेस एसटी कडून सोडण्यात येतील, असे  एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: coronavirus 250 additional ST buses will run from next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.