Join us

Coronavirus: राज्यात ३ लाख १५ हजार रुग्ण उपचाराधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 9:15 AM

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

मुंबई : राज्यात दिवसभरात २३,०६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आतापर्यंत एकूण ५२,४१,८३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २४,७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४५३ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,५०,९०७ झाली असून मृतांचा आकडा ९१ हजार ३४१ आहे.मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्केमुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३४८ दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्याच जास्त आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार ३६२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख १ हजार २६६ वर गेली आहे. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्के इतका आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर व उपनगरांत सध्या २७ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल. मुंबईत आतापर्यंत १४ हजार ७४२ जणांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.१९ टक्के  आहे. राज्यात २ कोटी १२ लाख लाभार्थ्यांना लस- मुंबई : राज्यात मंगळवारी १ लाख ९३ हजार ९१ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १२ लाख ४७ हजार १३३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख ४९ हजार ८३२ लाभार्थ्यांना लस दिली आहे.-राज्यात ११ लाख ६८ हजार १३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ७ लाख २४ हजार ५५१ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ लाख ९० हजार १७० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस  तर ७ लाख ५२ हजार ९८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई