मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सहार तथा मरोळ सारख्या अत्यंत दाटीवाटिच्या वस्त्या ज्या पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात येतात त्या सहार पोलिस ठाण्यातील ३२ जण आतापर्यंत कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहे.त्यामुळे सदर पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी विलेपार्ले मतदारसंघाचे भाजपा आमदार अँड.पराग अळवणी यांनी आज एका पत्राद्वारे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कडे सदर मागणी केली. तसेच त्याची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कड़े सदर पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
एकाच पोलिस ठाण्यात ३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागण होणे अतिशय गंभीर परिस्थिती असून आपल्या योद्धाची काळजी घेणे तसेच मोठ्या प्रमाणात विषाणूची लागण का होत आहे ? याबाबत विचार करावा लागेल. तसेच पुढील काळातील या लढाईत पुरेसा स्टाफ उपलब्ध असावा या बाबतही नियोजन करावे लागेल असे अळवणी यांनीपत्रात नमूद केले आहे.
सदर पोलिस ठाण्याच्या हद्दित विमानतळ येत असून सद्या प्रदेशातून येत असलेले प्रवासी तसेच कार्गो मुळे तेथे मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर आहे.तसेच सदर पोलिस ठाण्याच्या हद्दित असलेला सहार व मरोळ पाईपलाइन सारख्या भागात सुमारे ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामुळे सुद्धा तेथील कर्तव्य बजावणारे पोलिसकर्मी हाय रिस्क मध्ये येतात अशी माहिती त्यांनी दिली.
महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार मात्रविषम परंतू सकारात्मक हाय रिस्क मध्ये असलेल्या व्यक्तिची चाचणी करण्यात येत नाही.यामुळे असे संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण मात्र चाचणी शिवाय ट्रेस होत नाहीत.यामुळे अशा व्यक्ति मात्र सायलेंट कॅरिअर असल्याने इतरांना विष्णुने संक्रमित करु शकतो.विषेशतः जर अशी व्यक्ति बाहेर फिरत असल्यास त्यांच्या मुळे प्रादूर्भाव वाढू शकतो.
त्याच सोबत हे पण ध्यानात ठेवणे गरजेचे आहे कि वर्षभरा पूर्वी कर्तव्याच्या वेळा कमी करण्यात आल्या असल्यातरी वर्षोँवर्षे विचित्र वेळापत्रकामुळे व कर्तव्य बजावत असताना असलेल्या मानसिक ताणामुळे पोलिसकर्मियां मधली रोगप्रतिकारशक्ति कमी असू शकते.एखाद्या विषम परंतू सकारात्मक कोरोना रुग्णामुळे अशा एखाध्या असुरक्षित व्यक्तिस लागण झाल्यास गंभीर परिस्थिति निर्माण होउ शकते ऐसे पत्रात नमूद करत त्यांनी त्वरित उपाययोजनेची आवश्यकता शेवटी विशद केली.