CoronaVirus News: कोणत्या वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका?; सेरो सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 03:58 AM2020-10-08T03:58:18+5:302020-10-08T07:29:34+5:30

CoronaVirus News: कामानिमित्त बाहेर जात असल्याचा परिणाम

CoronaVirus 41 60 age group in Mumbai most exposed to Covid says Second sero survey | CoronaVirus News: कोणत्या वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका?; सेरो सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर

CoronaVirus News: कोणत्या वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका?; सेरो सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर

Next

मुंबई : सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीत ४१ ते ६० वयोगटातील लोकांना कोरोना होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. चाळी व झोपडपट्टीमधील नागरिकांमध्ये सरासरी ४५ टक्के व इमारतींमध्ये सुमारे १८ टक्के अ‍ॅण्टिबॉडीज तयार झाल्याचेही उजेडात आले आहे.

कोविडची बाधा झाल्यानंतर रुग्णाच्या शरिरात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होताना रक्तद्रव्यामध्ये (प्लाझ्मा) प्रतिद्रव्ये (अ‍ॅण्टिबॉडीज) तयार होतात. ही प्रतिद्रव्ये या सर्वेक्षणात तपासली जातात. नीती आयोग, महापालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरीत्या सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. आर मध्य - दहिसर - बोरीवली, एम पश्चिम - चेंबूर, एफ उत्तर (दादर, माटुंगा, वडाळा) या तीन विभागांत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

झोपडपट्टीतील ३,०२२ तर बिगर झोपडपट्टी परिसरातील २,१७४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ४१ ते ६० वयोगटातील लोक कामानिमित्त, प्रभातफेरी व मित्रांच्या भेटीगाठीसाठी जाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या वयोगटातील लोकांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असल्याने ते सुरक्षित असल्याचे दिसून आले.

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज किंचित जास्त
झोपडपट्ट्यांमध्ये ४१ ते ६० या वयोगटात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५०.३ टक्के आहे. तर इमारतींमध्ये या वयोगटातील बाधित रुग्णांचे प्रमाण १८.६ टक्के एवढे होते.
६० वर्षांवरील लोकांमध्ये ४८.२ टक्के, २५ ते ४० दरम्यान ४२.२ टक्के, १२ ते २४ वर्षे वयोगटात ४०.८ टक्के बाधित आढळून आले. इमारतींमध्ये १२ ते २४ वयोगटांत १८.५ टक्के, २५ ते ४० मध्ये १६.६ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण १३.२ टक्के आहे.
सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले. बरे झालेले रुग्ण, लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधीनंतर अ‍ॅण्टिबॉडीज पातळीत घट दिसून आली. ही बाब दोन्ही फेºयांमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शविते.

Web Title: CoronaVirus 41 60 age group in Mumbai most exposed to Covid says Second sero survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.