Join us

CoronaVirus News: मुख्यमंत्री कार्यालयातील ४२ कर्मचारी होते बाधित!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:50 AM

CoronaVirus News: कोणतीच लक्षणे नव्हती; नाही टेस्ट, नाही उपचार तरीही झाले बरे !

- यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत असलेल्या १२६ कर्मचारी, अधिकारी यांची अँटिबॉडी टेस्ट केली असता त्यातील ४२ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आले. याचा अर्थ त्यांना कोरोना होऊन गेला आणि त्यांनी कोणत्याही उपचारांशिवाय त्यावर मातही केली.मात्र, गेल्या काही महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेले कर्मचारी, अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात काम करीत होते ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे. गेल्या १ आॅक्टोबर रोजी ही टेस्ट मुंबई महापालिकेच्या पथकाने केली. ५ आॅक्टोबरला त्याचा अहवाल आला. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील ४० कर्मचारी आणि या कार्यालयात विविध सेवा देण्यासाठी येणारे दोन कर्मचारी यांची अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यात निधी कक्ष आणि टपाल कक्षातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. निधी कक्ष हा सातव्या माळ्यावर तर टपाल कक्ष हा तळमजला आणि मुख्यमंत्री बसतात त्या सहाव्या माळ्यावरही आहे.ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली ते सर्व कर्मचारी स्वस्थ असून आजही कामावर आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा कोणतीही लक्षणे नव्हती आणि त्यांनी टेस्टही केलेली नव्हती. अँटिबॉडी विकसित होऊन उपचारांविना आणि कुठलीही कल्पना नसताना त्यांनी कोरोनावर मातही केली. या कर्मचाऱ्यांची आयजीजी अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ गेल्या काही दिवसात कोरोनाने त्यांच्यात शिरकाव केला होता, पण त्यांनी त्यावर मात केली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे