coronavirus: राज्यात ४२ टक्के चाचण्या; पण, मुंबईत १४ टक्के वाढ , देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:52 AM2020-09-03T04:52:59+5:302020-09-03T04:53:50+5:30

देशाची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणाºया राज्यांतसुद्धा महाराष्ट्र नाही. सर्वात कमी राजस्थानमध्ये ४.१८ टक्के तर भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

coronavirus: 42% tests in the state; But, 14% increase in Mumbai, Devendra Fadnavis's letter to the Chief Minister | coronavirus: राज्यात ४२ टक्के चाचण्या; पण, मुंबईत १४ टक्के वाढ , देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

coronavirus: राज्यात ४२ टक्के चाचण्या; पण, मुंबईत १४ टक्के वाढ , देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

मुंबई : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत आॅगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबईत जुलैमध्ये दररोज चाचण्यांची संख्या ६५७४ होती, ती ७७०९ वर गेली. ही वाढ केवळ १४ टक्के आहे. तर राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत ३७५२८ इतक्या झाल्या, ती संख्या वाढून आॅगस्टमध्ये प्रतिदिन ६४८०१ इतकी झाली. ही वाढ ४२ टक्के आहे. आॅगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात १८.४४ टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा बराच अधिक आहे. देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणाऱ्या राज्यांची सरासरी काढली तर त्यातही महाराष्ट्र मागे आहे. सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणाºया राज्यात गोवा (१५८४), आंध्र (१३९१), दिल्ली (९५०), तामिळनाडू (८४७), आसाम (७४८), कर्नाटक (७४०), बिहार (६५०), तेलंगाणा (६३७), उत्तराखंड (५९०), हरयाणा (५६३) इतकी आहे.

देशाची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणाºया राज्यांतसुद्धा महाराष्ट्र नाही. सर्वात कमी राजस्थानमध्ये ४.१८ टक्के तर भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, साताºयात खाटांची क्षमता अधिक वाढवावी, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणावेत, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही फडणवीस यांनी केल्या आहेत.
 

Web Title: coronavirus: 42% tests in the state; But, 14% increase in Mumbai, Devendra Fadnavis's letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.