Join us

coronavirus: महिनाभरात ५ हजार ७३६ पोलिसांना कोरोनाची लागण, ५२ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:47 AM

आतापर्यंत १५ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, १२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात १ हजार २१७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या ३० दिवसांत ५२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १५४ वर गेला आहे.

मुंबई : राज्यभरात सुमारे महिनाभरात म्हणजे ३० आॅगस्टपर्यंत तब्बल ५ हजार ७३७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तर ५२ पोलिसांना जीव गमवावा लागला.आतापर्यंत १५ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, १२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात १ हजार २१७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या ३० दिवसांत ५२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १५४ वर गेला आहे. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकड़ून २ लाख ४४ हजार ५८६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी ३४ हजार १४८ जणांना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान ९६ हजार ८० वाहने जप्त करण्यात आली.पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी ३४१ गुन्हे नोंद झाले असून, ८९१ जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरात पोलीस नियंत्रण कक्षात कोरोनासंबंधित विचारणा किंवा तक्रार करणारे १ लाख ११ हजार १९८ कॉल आले आहेत.१ लाखाहून अधिक कॉल्सपोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी ३४१ गुन्हे नोंदझाले असून, ८९१ जणांना अटक करण्यातआली आहे. तर आजपर्यंत राज्यभरात पोलीस नियंत्रण कक्षात प्रथमच कोरोनासंबंधित विचारणा किंवा तक्रार करणारे १ लाख ११ हजार १९८ एवढया मोठया संख्येने कॉल आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस