Join us

CoronaVirus: धारावीमध्ये एका आठवड्यात रुग्ण संख्येत ५० टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 5:31 AM

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेला धारावी पॅटर्नचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून येत आहे. गेले काही ...

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेला धारावी पॅटर्नचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून येत आहे. गेले काही दिवस येथील काेराेनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत होती. मात्र अनेक उपाययोजनांमुळे अखेर आठवड्याभरात रुग्णसंख्येत घट दिसून आली. सोमवारी धारावीत २५ बाधित रुग्ण सापडले.

ऑक्टोबर २०२० नंतर धारावीत एक अंकी रुग्णांची नोंद होत होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये धारावीत रुग्ण वाढ दिसून आल्यानंतर जी उत्तर विभागाने  तातडीने पावले उचलत मोबाइल चाचणी व्हॅन, फिव्हर क्लिनिक, बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला. या मोहिमेचा प्रभाव आता दिसून येत आहे. 

मुंबईत एका दिवसात १७०० बाधित घटले

कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी घट पहायला  मिळाली. मुंबईत रविवारी ५५४२, शनिवारी ५८८८, तर शुक्रवारी ७२२१  रुग्णांचे निदान झाले होते. गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ८७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रविावारच्या तूलनेत हा आकडा १६६६ इतका कमी आहे. 

ठाण्यातही दिलासा ????

ठाणे जिल्ह्यात रविवारच्या तूलनेत जवळपास १२०० नी  कमी येथील कोरोना बाधितांची संख्या नोंदवली गेली. रविवारी येथील रुग्णसंख्या ४२११ इतकी होती. सोमवारी हा आकडा ३०१२ इतका झाला.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई