मुंबई : मुंबईत साेमवारी काेराेनाचे ५ हजार ८८८ रुग्ण आढळले असून, १२ रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी, आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार ५६२ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६६१ झाला आहे. सध्या शहर उपनगरात ४७ हजार ४५३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यात नव्याने ३१,६४३ काेराेनाबाधित आढळले असून १०२ जणांनी जीव गमावला.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५३ दिवसांवर आला आहे. २२ ते २८ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.२७ टक्के असल्याचे दिसून आले. मुंबईत दिवसभरात ३३ हजार ९६६ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ४० लाख १७ हजार ३१६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्स ६४ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५७८ आहे. मागील २४ तासांत मुंबई महापालिकेने काेराेना रुग्णांच्या सहवासातील २४ हजार ८०८ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. ३ लाख ३६ हजार रुग्ण उपचाराधीनnराज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २७ लाख ४५ हजार ५१८ झाली असून एकूण मृतांचा आकडा ५४ हजार २८३ झाला आहे. सध्या ३,३६,५८४ रुग्ण उपचाराधीन आहेत. nराज्यात दिवसभरात २०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २३,५३,३०७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.९८ टक्के आहे. nआजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होम, तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
महिन्याभरात काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दुप्पट मुंबई : राज्यात मागील महिन्यात राज्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले होते, मात्र महिन्याभरात काेराेना पाॅझिटिव्हिचे प्रमाण दुप्पट झाले आहे.राज्यात १४ मार्च रोजी १ लाख ७ हजार ५३६ कोरोना चाचण्या झाल्या, त्यात १६,६२० रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी दैनंदिन पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १५.४६ टक्के हाेते. यात नंतर वाढ झाली. १५ मार्चला ९१,८७० चाचण्या करण्यात आल्या, त्यात १५,०५१ रुग्णांची नोंद झाली. तर पॉझिटिव्हिटी प्रमाण एक टक्क्याने वाढले. या दिवशी पॉझिटिव्हिटी प्रमाण १६.३८ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानंतर, प्रत्येक दिवशी पॉझिटिव्हिटीचे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. १८ मार्चला ते २१.४७ टक्के होते. त्यानंतर २१ मार्चला २२.२५ टक्के हाेते. २२ मार्च रोजी २३.४१ टक्के, तर २३ मार्च रोजी २३.६३ टक्के पॉझिटिव्हिटी प्रमाण असल्याची नोंद आहे. अशी झाली उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढराज्यात १ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७७,६१८ होती. यात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २६ मार्च रोजी राज्यात २ लाख ८२ हजार ४५१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मागील काही दिवसांत संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी दैनंदिन चाचण्यांच्या क्षमतेत वाढ करून दिवसाला १ लाख २० हजारांच्या घरात चाचण्या करण्यात येत आहेत.