Join us

CoronaVirus News: ६५ टक्के वृद्धांनी गमावला रोजगार; ४२ टक्के ज्येष्ठ नागरिक आजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:19 AM

आर्थिक ओढाताण, एकटेपणाची बळावतेय भावना

ठाणे : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये ६५ टक्के वृद्धांनी त्यांचे आर्थिक स्रोत गमावले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील वृद्धांना सर्वाधिक फटका बसला आहे. ‘हेल्पेज इंडिया’ या बिगर सरकारी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६२ टक्के वृद्धांना मधुमेह, अस्थमा, कर्करोग, उच्च रक्तदाब यांसारखे कोणते ना कोणते आजार आहेत. यापैकी ४२ टक्क्यांची प्रकृती लॉकडाऊनमध्ये बिघडली होती. ७८ टक्के वृद्धांना जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळवण्यात अडचणी येत आहेत. ६१ टक्के वृद्धांमध्ये अडगळीत आणि समाजापासून वेगळे पडल्याची भावना निर्माण झाली असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.वृद्धांना आरोग्याची जोखीम, उत्पन्नाचा स्रोत गमावल्याने जगण्याची चिंता आणि सामाजिक एकटेपण अशा तीन पातळ्यांवर लढावे लागत आहे. शहरी आणि ग्रामीण भागांत अनेक वृद्ध एकाकी असून छोटीमोठी नोकरी-व्यवसाय करून जगत आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा हा आधारही गेल्यामुळे त्यांना अर्धपोटी झोपावे लागत आहे. घराबाहेर पडावे तर कोरोनाची भीती आणि घरात बसावे तर खायचा प्रश्न, अशा कात्रीत सापडलेल्या वृद्धांवर ‘सन्मान नको, सामान हवे’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.संस्थेचे महाराष्टÑ आणि गोवा विभागाचे प्रमुख प्रकाश बोरगावकर म्हणाले की, लॉकडाऊन हा ज्येष्ठ नागरिकांची कसोटी पाहणारा काळ ठरला आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे एकाकी जीवन जगणाऱ्यांसमोर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोसायट्यांनी घरकाम करणाºया महिला, केअरटेकर यांना बंदी केली आहे. तसेच वृद्धांना धोका असल्यामुळे बाहेरही पडता येत नसल्याने औषधे, अन्नधान्यही मिळवणे जिकरीचे झाले आहे. आधीच एकटे राहत असल्यामुळे आता त्यांच्यात अडगळीत टाकल्याची भावना बळावत आहे. त्यामुळे त्यांना केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक आधाराचीही गरज आहे.आर्थिक स्रोत नसलेल्या अनेक वृद्धांना काम करून आपला खर्च भागवावा लागत आहे. तर काहींच्या वाट्याला मुले परदेशात असल्याने एकाकी जीवन आले आहे. ९० टक्के वृद्ध हे असंघटित क्षेत्रात काम करणारे आहेत. काही जण घरकाम, भाजीविक्री, खासगी शिकवण्या घेऊ न आपला उदरनिर्वाह करतात. हे जगण्याचे साधनच ठप्प असल्याने ते हतबल झाल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे.कशाची वाटतेय ‘त्यांना’ भीती३८ टक्के वृद्धांना कोरोनाची लागण, तसेच सामाजात वावरण्याची आणि उत्पन्न गमावण्याची भीती३४ टक्क्यांना आर्थिक नुकसान, उपासमार आणि बेरोजगारीची धास्ती१२ टक्क्यांना प्रवास, सामूहिक फैलाव आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेविषयी भयलॉकडाऊ नमध्ये जेव्हा आम्ही मुंबई, ठाणे परिसरात मदतीसाठी अनेक वृद्धांना भेटतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. या शहरांत सोसायट्यांमध्ये एकटे राहणाºया वृद्धांना हवे-नको ते पाहण्यासाठी कोणीच नाही. घरकामगार, केअरटेकर यांना सोसायट्यांनी बंदी केली आहे. काळजी घ्या सांगणारे बरेच भेटतात, पण तुम्हाला काय हवे आहे का? असे विचारणारे कोणी नाही, अशी खंत व्यक्त करून ‘सन्मान नको, सामान हवे’, अशी केविलवाणी साद घालतात. सरकारने त्यांच्या गरजांकडे वेळेत लक्ष दिले पाहिजे.- प्रकाश बोरगावकर, प्रमुख, महाराष्टÑ-गोवा विभाग, हेल्पेज इंडिया

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या