coronavirus: भायखळा केंद्रातून ७५६ रुग्ण कोरेनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:21 AM2020-07-06T02:21:36+5:302020-07-06T02:21:53+5:30

मुंबई : राष्ट्रीय स्तराचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील कोविड केंद्रातून ...

coronavirus: 756 patients Corona free from Byculla center | coronavirus: भायखळा केंद्रातून ७५६ रुग्ण कोरेनामुक्त

coronavirus: भायखळा केंद्रातून ७५६ रुग्ण कोरेनामुक्त

Next

मुंबई : राष्ट्रीय स्तराचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील कोविड केंद्रातून या कोरोनामुक्तीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. या कोविड केंद्रातून सुमारे ७५६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील कोविडचे एक मोठे उपचार केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेल्या या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र लवकरच रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती ‘इ’ विभागाचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे.

रुग्ण दाखल करण्याची प्रक्रियेत भायखळा, डोंगरी व भेंडीबाजार अशा नजीकच्या परिसरांतून कोरोना रुग्णाचे निदान झाल्यास महापालिका नियंत्रण कक्षास संपर्क साधून खाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती घेतली जाते. त्यानंतर रुग्णाची अवस्था पाहून लक्षणे असल्यास, लक्षणविरहित असल्यास त्याप्रमाणे नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी रुग्णास माहिती देतात. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णास या केंद्रात दाखल करते. रुग्णाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून सहवासितांचा शोध घेण्यात येतो. त्यांना विलगीकरणाविषयी सूचना देण्यात येतात.

आॅक्सिजन खाटांची तयारी अंतिम टप्प्यात, ‘कोविड कोरोना १९’ बाधित रुग्णांवर उपचार, १ हजार खाटांपैकी ३०० खाटा या ‘आॅक्सिजन बेड’ असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५० डॉक्टर, १०० परिचारिका आणि १५० परिचर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, असे एकूण ३०० कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असणार आहेत.

अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात व ‘परिमंडळ १’चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात असून या महिनाअखेरीस हे ‘जम्बो फॅसिलिटी’ उपचार केंद्र कार्यान्वित होईल. ‘परिमंडळ १’चे सहायक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद आष्टेकर आणि ‘इ’ विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. निपा मेहता यांनी जबाबदारी सांभाळली. ‘इ’ विभागातील परिरक्षण खात्यातील सहायक अभियंता अक्षय जगताप, दुय्यम अभियंता पूजा तावडे यांनी अथक मेहनत घेतली असल्याची माहिती दगडखैर यांनी दिली आहे.

जेवण, नाश्त्याची सोय; दोन हजार डॉक्टरांची फौज कार्यरत
1महापालिका प्रशासनाच्या वतीने सकाळचा नाश्ता आणि दोन वेळेचे जेवण या ठिकाणी रुग्णांना देण्यात येते. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांना आहारविषयक पथ्य आहेत, त्याविषयी डॉक्टरांकडून मार्गदर्शन करÞण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जेवणात दोन चपात्या, वरण, भात व भाजीचा समावेश असतो. त्याचप्रमाणे, फळे व दूधही पुरविण्यात येते. या केंद्रातील आहारविषयक सोयीविषयी रुग्णांना विचारले असता काही वेळा जेवण उशिरा येत असल्याचे सांगितले.

2 तर काही वेळेस रुग्ण अधिकचे जेवण घेऊन ठेवत असल्याने अन्य व्यक्तींना जेवण मिळत नसल्याचीही तक्रार नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. वेतन उशिरानेच, योद्ध्यांकडे दुर्लक्ष, भायखळा कोविड केंद्रात सुमारे २००च्या जवळपास डॉक्टर, आरÞोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात या सर्व योद्ध्यांना शारीरिक मेहनतीसोबतच मानसिक स्थैर्याचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान आहे. अशा कठीण काळात कर्तव्य बजावत असतानाही समाजाकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी मांडली. तसेच, शासनाकडून निर्धारित केलेले वेतन मिळण्यास विलंब होत असल्याचे येथे सेवा बजावणाºया डॉक्टर, आरोग्य कर्मचाºयांनी मांडली. मात्र सध्याचा काळ हा अत्यंत आव्हानात्मक आहे, त्यामुळे आम्हीही खचून न जाता सेवा बजावत राहणार असल्याचे सांगितले.

Web Title: coronavirus: 756 patients Corona free from Byculla center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.