Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:01 AM2020-06-30T04:01:07+5:302020-06-30T04:01:21+5:30

मुंबईतील एम पश्चिम चेंबूर विभागात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १०.४७ टक्के आहे. देशाचा एकूण मृत्यूदर तीन टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८१ टक्क्यांपर्येत पोहोचला आहे

Coronavirus: 76 thousand 765 infected in Mumbai; 1 thousand 226 and 21 deaths were recorded during the day | Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद

Coronavirus: मुंबईत ७६ हजार ७६५ बाधित; दिवसभरात १ हजार २२६ तर २१ मृत्यूंची नोंद

Next

मुंबई : मुंबईत दिवसभरात १ हजार २२६ रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येने ७६ हजार ७६५ चा टप्पा गाठला आहे, तर ४३ हजार ५४५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. दिवसभरात २१ मृत्यू झाले असून एकूण ४ हजार ४६३ बळी गेले आहेत. सध्या शहर उपनगरात २८ हजार ७४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ५७ टक्के आहे. तर गेल्या आठवड्याभरात मुंबईतील कोविड वाढीचा एकूण दर १.६९ टक्के आहे. याशिवाय, २७ जून पर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख २४ हजार ६६६ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ४१ दिवसांवर गेला आहे. दिवसभरात ७६३ कोविड संशयित रुग्ण पालिका रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत ५२ हजार ७३५ रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे.

या विभागात देशाच्या तिप्पट मृत्यूदर
मुंबईतील एम पश्चिम चेंबूर विभागात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १०.४७ टक्के आहे. देशाचा एकूण मृत्यूदर तीन टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.८१ टक्क्यांपर्येत पोहोचला आहे. या मृतांमध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक रुग्णांची संख्या जास्त आहे. वांद्रे पूर्व, डोंगरी, वरळी, प्रभादेवी, दादर आणि धारावी हे सर्वाधिक मृत्यू असलेले पाच विभाग आहेत. चेंबूर पाठोपाठ एच पूर्व म्हणजे वांद्रे, खार, सांताक्रुझ पूर्व विभागात ८.२२ टक्के मृत्यूदर आहे. या भागांत झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक असून मृत्यू जास्त प्रमाणात होत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Coronavirus: 76 thousand 765 infected in Mumbai; 1 thousand 226 and 21 deaths were recorded during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.