coronavirus: राज्यात दिवसभरात तब्बल ७८६२ कोरोना रुग्ण, २२६ जणांचा मृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:42 AM2020-07-11T06:42:55+5:302020-07-11T06:43:19+5:30
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी आठ हजारांच्या जवळ गेली असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल ७८६२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली असून २२६ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी आठ हजारांच्या जवळ गेली असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी ५३६६ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १,३२,६२५ बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के एवढे झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारी नोंद झालेल्या २२६ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा ७३, ठाणे ९, ठाणे मनपा ८, नवी मुंबई मनपा १२, कल्याण-डोंबिवली मनपा १०, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी-निजापूर मनपा ८, मीरा-भार्इंदर मनपा १, पालघर १, वसई-विरार मनपा ९, रायगड ३, पनवेल मनपा ६, नाशिक १, नाशिक मनपा ४, धुळे मनपा ४, जळगाव ४, जळगाव मनपा ३, नंदूरबार २, पुणे ५, पुणे मनपा २१, पिंपरी-चिंचवड मनपा ११, सोलापूर २, सोलापूर मनपा ३, अशा विविध ठिकाणांवरील रुग्णांचा समावेश आहे.