coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वास्तव्य असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 82 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:29 PM2020-04-13T21:29:51+5:302020-04-13T21:36:03+5:30
पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे.लोकमतला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आज संध्याकाळ पर्यत 420 वर गेला आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - वांद्रे ते दहिसर पूर्व अश्या विस्तीर्ण पसरलेल्या व सुमारे 65 लाख लोकवस्ती असलेल्या पश्चिम उपनगराची गणना होते. पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे.लोकमतला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आज संध्याकाळ पर्यत 420 वर गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्ड मध्ये कोरोनाचे आता 82 रुग्ण झाले आहेत.
पश्चिम उपनगरात अजूनही नागरिक विनाकारण किराणा,भाजी व फळे विकत घेण्यासाठी बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना वेसण कशी घालायची हा पोलिस यंत्रणा व पालिका प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम या भागांचा मिळून के पश्चिम वॉर्ड असून येथे कोरोनाचे 89 रुग्ण झाले आहेत.पी दक्षिण मध्ये 31 व पी उत्तर मध्ये 60 असे परिमंडळ 4 मधील या तीन वॉर्ड मधील आता कोरोनाचे 180 रुग्ण झाले आहेत.
के पश्चिम हा सुमारे 5 लाख 80 हजार लोकसंख्या असलेला विलेपार्ले पश्चिम ते जोगेश्वरी पश्चिम पर्यंत पसरलेला मोठा वॉर्ड आहे.पालिकेच्या नकाश्यावर हा कोरोनाचा हॉट स्पॉट असून येथे कोरोनाचे तब्बल 88 रुग्ण आहेत.त्या खालोखाल एच पूर्व वॉर्ड मध्ये कोरोनाचे 82 रुग्ण आहेत.तर मालाड पश्चिम मढ जेट्टी ते थेट दिंडोशीच्या मालाड पूर्व कुरार पर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या आणि 10 लाख लोकसंख्या असलेल्या पी उत्तर वॉर्ड मध्ये कोरोनाचे 60 रुग्ण झाले आहेत.
पालिकेच्या वॉर्ड विभागणीनुसार पश्चिम उपनगरात एच पूर्व,एच पश्चिम,के पूर्व,के पश्चिम,पी दक्षिण,पी उत्तर,आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात.पश्चिम उपनरातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून के पश्चिम वॉर्ड असून यामध्ये कोरोनाचे 89 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्या खालोखाल एच पूर्व मध्ये 82,पी उत्तर मध्ये 60,एच पश्चिम मध्ये 30,के पूर्व मध्ये 56,आर दक्षिण मध्ये 38,,पी दक्षिण मध्ये 31,आर मध्य मध्ये 19 व आर उत्तर मध्ये 15 असे एकूण पश्चिम उपनगरात कोरोनाचे 420 रुग्ण झाले आहेत.