Coronavirus : कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:48 PM2020-05-06T12:48:46+5:302020-05-06T12:49:06+5:30

विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Coronavirus : 95,000 cases have been registered in the state regarding corona; Information of Anil Deshmukh vrd | Coronavirus : कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

Coronavirus : कोरोनासंदर्भात राज्यात आतापर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

Next

मुंबई - राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोनासंदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ५ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  ९५,६७८  गुन्हे नोंद झाले असून १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

१०० नंबर
पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यांत २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर  प्रचंड भडिमार झाला. ८४,९४५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६४२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,११,६३८ व्यक्ती Quarantine  आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२७९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५३,०७१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ३ व पुणे येथील १ अशा ४ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली, तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण ४८०८ हजार रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ४,४२,२९८  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

प्रतिलिटर 18 रुपयांच्या पेट्रोलवर 49 रुपये टॅक्स, समजून घ्या पेट्रोल-डिझेलचं गणित...

CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर संकट; PF व्याजदरात कपात, जाणून घ्या...

CoronaVirus: कौतुकास्पद! सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी १००० कुटुंबांना दिलं धान्य

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

CoronaVirus News: लॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

Web Title: Coronavirus : 95,000 cases have been registered in the state regarding corona; Information of Anil Deshmukh vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.