Coronavirus: दिलासादायक! राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:57 AM2020-04-24T10:57:45+5:302020-04-24T11:01:25+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी एक महाराष्ट्रसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.

Coronavirus: About 94% of coronavirus tests are negative in maharashtra mac | Coronavirus: दिलासादायक! राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह

Coronavirus: दिलासादायक! राज्यातील जवळपास 94% कोरोना चाचण्या निगेटिव्ह

googlenewsNext

मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण  मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७७८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६४२७ वर पोहचली आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी एक महाराष्ट्रसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.

राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून आता राज्यात दररोज 7 हजारपेक्षाही अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाने सादर केलेल्या अहवालानूसार, आतापर्यत झालेल्या एकूण कोरोनाच्या चाचण्यांपैकी जवळपास  94 टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे राज्याला थोडा दिलासा मिळणार आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असा दिलासा देतानाच मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

Web Title: Coronavirus: About 94% of coronavirus tests are negative in maharashtra mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.