Coronavirus: गैरहजर ४० ‘बेस्ट’ कर्मचारी बडतर्फ; कारवाईला कामगारांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:24 AM2020-07-04T02:24:10+5:302020-07-04T02:24:44+5:30
७०० जणांना नोटीस : प्रशासन भूमिकेवर ठाम
मुंबई : गैरहजर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या कारवाईला कामगार संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. मात्र बेस्ट प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असून एकूण ४० कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कठोर कारवाई करण्यात आली असून ७०० जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये वाहन चालक आणि वाहकांची संख्या अधिक आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना बेस्ट उपक्रमाने दिलासा दिला. मात्र बहुतांश कर्मचारी गैरहजर राहिल्याने बेस्टच्या ताफ्यातील अनेक बस गाड्या आगराबाहेर काढणे शक्य होत नव्हते. तसेच कामावर दररोज उपस्थित राहणाºया अन्य कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढत होता. त्यामुळे गैरहजर कर्मचाºयांना प्रशासनाने नोटीस पाठविल्या. नोटीस मिळताच बरेच कर्मचारी कामावर रुजू झाले. परंतु अद्यापही काही कर्मचारी गैरहजर राहत आहेत.
आतापर्यंत अशा सातशेहून अधिक कर्मचाºयांना बेस्ट उपक्रमाने नोटीस पाठवली आहे. तर ४० कर्मचाºयांना बडतर्फ केले आहे. मात्र काही कर्मचारी गावी तर काही आजारी आहेत. काही कर्मचारी बाधित क्षेत्रात राहत असल्याने गैरहजर असल्याचा दावा बेस्ट कामगार संघटना करीत आहे. मात्र अन्य कर्मचारी कामावर येत असताना काही कर्मचाºयांना अशाप्रकारे सूट देणे योग्य नाही, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली आहे.
आगारांमध्ये मूक निदर्शने
- बेस्ट कर्मचाºयांना स्वसंरक्षण किट मिळत नसल्याचा आरोप कामगार संघटना करीत आहेत. तसेच कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांचे प्रतिनिधी विविध बस आगारांमध्ये मूक निदर्शने करीत आहेत.
- कर्मचाºयांना बडतर्फ करण्याची कारवाई अन्यायकारक असून याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार, असा इशारा बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिला आहे.
- बेस्ट उपक्रमातील पाचशेहून अधिक कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी ५८ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा कामगार संघटना करीत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे निधन झालेल्या नऊ कर्मचाºयांच्या वारसाला बेस्टमध्ये नोकरी व ५० लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.