CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 06:15 PM2020-05-27T18:15:50+5:302020-05-27T18:30:26+5:30

CoronaVirus News: सरकारला बदनाम करायचे काम त्यांच्याकडून होत आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

CoronaVirus : The act of defaming the government by the opposition; Balasaheb Thorat's attack vrd | CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

Next

मुंबई- राज्यावर कोरोनाचं मोठं संकट आलेलं असतानाही राजकारणी एकमेकांवर बेछुत आरोप-प्रत्यारोप करत सुटले आहेत. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतानाच विरोधक त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या तीन मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे. विरोधी पक्षाकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती, परंतु सरकारला बदनाम करायचे काम त्यांच्याकडून होत आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू आणि जनतेला कोरोनाच्या संकटातून मुक्त करणार आहोत. विरोधकांकडून सहकार्य करण्याऐवजी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र काम सुरू आहे. महाराष्ट्र हे उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. परराज्यातील कामगारांच संगोपन महाराष्ट्र सरकारकडून झालेल आहे. तसेच इथून त्यांना घरी पाठवण्याची सोय देखील आपण सोय केलेली आहे. राज्य सरकार परप्रांतीयांची व्यवस्थित सोय करत आहे. मुंबईची स्थिती ही काळजीची आहे. मुंबईसाठी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालून उपाययोजना केलेली आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. 

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनीसुद्धा विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जितक्या चाचण्या झाल्या तितक्या चाचण्या कुठेही झालेल्या नाहीत. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यावर कोणतीही मेहरबानी केलेली नाही. वेगळा असा कोणताही निधी महाराष्ट्रासाठी केंद्राने दिलेला नसल्याचंही शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. एका तासाच्या अवधीत ट्रेन ची वेळ सांगतात. जाणीवपूर्वक प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण करतात. असे करून सरकारला बदनाम करण्याचे काम चालू आहे. चीनमध्ये कमी दिवसात रुग्णालय उभे राहिले, त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत झाले मात्र त्याचे कौतुक झाले नाही. केंद्राकडून १९,००० कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला मिळाले असे बोलले, पण तसे नसून १८,२७९ कोटी हक्काचे पैसे महाराष्ट्राला अजून मिळालेले नाही. केंद्र सरकारने जीएसटीचे महाराष्ट्राचे हक्काचे पैसे अजूनही दिलेले नाही. पीयूष गोयल हे फक्त ट्विटरवरून घोषणा करतात प्रत्यक्षात काहीही करत नाहीत. कायद्यात बसणारे पैसे तरी  महाराष्ट्र सरकारला मिळाले पाहिजेत. महाराष्ट्राचे केंद्राकडे  ४२ हजार कोटी थकीत आहेत, असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे.  

तर जयंत पाटील यांनीसुद्धा ठाकरे सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे.  भारतात जर कुठे उत्तम काम झालं असेल. तर ते मुंबई आणि महाराष्ट्रात झालेलं आहे. WHO बोलले होते की १.५ लाख केसेस होतील, परंतु आमच्या अंदाजाने फक्त ६० हजार केसेस असतील हे महाराष्ट्र सरकारचे उत्तम काम आहे, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे. 

ही वाचा

CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

Web Title: CoronaVirus : The act of defaming the government by the opposition; Balasaheb Thorat's attack vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.