coronavirus: आठ सनदी अधिकाऱ्यांसमोर कोरोना रोखण्याचे लक्ष्य, पालिकेचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:00 AM2020-05-13T03:00:04+5:302020-05-13T03:00:51+5:30

या पथकात असलेल्या पालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोना रोखण्याचे काम करावे लागणार असल्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मंगळवारी काढलेल्या परिपत्रकातून दिले आहेत.

coronavirus: Aims to prevent coronavirus in front of eight chartered officers, decision of the municipality | coronavirus: आठ सनदी अधिकाऱ्यांसमोर कोरोना रोखण्याचे लक्ष्य, पालिकेचा निर्णय 

coronavirus: आठ सनदी अधिकाऱ्यांसमोर कोरोना रोखण्याचे लक्ष्य, पालिकेचा निर्णय 

Next

मुंबई : लॉकडाउनचा कालावधी संपत आला तरी रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आठ सनदी अधिकाऱ्यांची फौज नियुक्त केली आहे. सात परिमंडळाची जबाबदारी त्यांच्याकडे वाटून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता संबंधित अधिकाºयांवर जबाबदाºयाही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये  रुग्णालयांचे नियंत्रण, उपचार, बाधित रुग्णांना शोधणे, लॉकडाउन शिथिल झाल्यास उपाययोजना, पालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाºया सर्व सेवा-सुविधांचा नियमित आढावा अशा सर्वांचा  अहवाल पालिका आयुक्तांना सादर करावा लागणार आहे. त्यानंतर परिमंडळ व्यतिरिक्त या अधिकाºयांवर आणखी काही जबाबदाºया सोपवण्यात आल्या आहेत. या पथकात असलेल्या पालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांना आपला नियमित कार्यभार सांभाळून कोरोना रोखण्याचे काम करावे लागणार असल्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मंगळवारी काढलेल्या परिपत्रकातून दिले आहेत.

प्राजक्ता लवांगरे-वर्मा : कोविड योद्धा नेमणे, स्वयंसेवक, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असे आरोग्य कर्मचारी नेमण्याची जबाबदारी. 
आशुतोष सलिल : कोविड केअर सेंटर-२ आणि कोविड केअर सेंटर-३ची मोठ्या प्रमाणात निर्मिती, पालिकेला सहकार्य करणाºया ‘म्हाडा’, ‘सिडको’शी समन्वय साधणे, आॅक्सिजन-आयसीयू व्यवस्था पाहणे, मनुष्यबळाचे व्यवस्थापन.

अशा आहेत जबाबदाºया...

मनीषा म्हैसकर : रुग्णालयांतील खाटांची व्यवस्था पाहणे, सर्व पालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांकडून नियमित आढावा घेणे, समन्वयासाठी गट तयार करून काम करणे. सर्व अधिष्ठाता म्हैसकर यांना अहवाल सादर करणार आहेत.
अश्विनी भिडे : पालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रूमची जबाबदारी आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, क्वारंटाइन, कोविड-१९ सेंटर आणि प्रतिबंधित क्षेत्रांचे व्यवस्थापनासंबंधातील बाबींवर नियंत्रण ठेवणे.
संजीव जयस्वाल : स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याबाबत राज्य सरकारशी समन्वय, त्यांचे प्रश्न, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे.
च्सुरेश काकाणी : मोठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचे व्यवस्थापन, डिस्चार्ज प्रोटोकॉल आणि आरोग्य विभागाचे प्रशासन.
च्पी. वेलरासू : पावसाळापूर्व नालेसफाई, रस्ते, पूल बांधणी अशा कामांसह राष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रिनिंग, क्वारंटाइन आणि वैद्यकीय साधनांची खरेदी आणि पुरवठा या कामांवर नियंत्रण.
च्डॉ. एन. रामास्वामी : यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयातील खटांची क्षमता वाढविणे, वैद्यकीय कर्मचाºयांची नियुक्ती करणे, आरोग्य कर्मचाºयांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कामावर नियंत्रण ठेवणे.

Web Title: coronavirus: Aims to prevent coronavirus in front of eight chartered officers, decision of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.