Coronavirus : कोरोनाचा फटका चित्रीकरणाला, येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 06:16 PM2020-03-15T18:16:48+5:302020-03-15T18:19:53+5:30

Coronavirus: रविवारी मुंबईत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Coronavirus: all shooting canceled from next Thursday until March 31 | Coronavirus : कोरोनाचा फटका चित्रीकरणाला, येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग रद्द

Coronavirus : कोरोनाचा फटका चित्रीकरणाला, येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सर्व शूटिंग रद्द

Next
ठळक मुद्देयेत्या 2 दिवसांत आधी ठरविल्याप्रमाणे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करून गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण चित्रीकरणाला ब्रेक देण्यात येणार आहे .गुरुवारपासून गोरेगाव चित्रनगरी, मढ, ठाणे, मिरारोड या भागातील स्टुडिओ , बंगले यातील चित्रीकरण संपूर्णपणे ठप्प होणार आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता येत्या गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत सिनेमा, छोटा पडदा, वेबसिरीज, जाहिराती या सर्व मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घटकांचे संपूर्ण चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रविवारी मुंबईत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान निर्मात्याला होणार असून, या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या अनेक कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली होती. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिनेक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सिनेमांचे, मालिकांचे दिवस रात्र सुरू असणारे चित्रीकरण आणि या चित्रीकरणात दररोज एका ठिकाणी अनेक लोक एकत्र काम करत असतात. या गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झटपट होऊ शकतो. त्यामुळे यावर नियंत्रण राहावे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे, असे निर्माते अशोक पंडित यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले . 

याचा परिणाम मराठी सिनेमा आणि डेलीसोप यांच्या चित्रीकरणावरही पडणार आहे . येत्या 2 दिवसांत आधी ठरविल्याप्रमाणे राहिलेले चित्रीकरण पूर्ण करून गुरुवारपासून 31 मार्चपर्यंत संपूर्ण चित्रीकरणाला ब्रेक देण्यात येणार आहे . यामुळे येत्या गुरुवारपासून गोरेगाव चित्रनगरी, मढ, ठाणे, मिरारोड या भागातील स्टुडिओ , बंगले यातील चित्रीकरण संपूर्णपणे ठप्प होणार आहे.

आणखी बातम्या...

Coronavirus : MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारकडून सूचना, आरोग्यमंत्र्यांची माहिती

CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

Coronavirus : नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा

Corona virus : Coronaच्या संक्रमणादरम्यान व्हायरल झाली 'ही' शॉर्ट फिल्म, पाहून धक्काच बसेल!

 

 

Web Title: Coronavirus: all shooting canceled from next Thursday until March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.