Coronavirus : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख 32 हजार पासचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:00 PM2020-05-11T23:00:13+5:302020-05-11T23:04:43+5:30

Coronavirus : ६६२व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५८,७९२ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.

Coronavirus : Allotment of 3 lakh 32 thousand passes for essential services during lockdown pda | Coronavirus : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख 32 हजार पासचे वाटप

Coronavirus : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख 32 हजार पासचे वाटप

Next
ठळक मुद्दे राज्यात २२ मार्च ते १० मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,०३,३४५ गुन्हे नोंद झालेपोलीस विभागातील नियंत्रण कक्षात १०० या नंबरवर  लॉकडाऊन काळात या फोनवर  ८८,६२३ फोन आले

मुंबई -  लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,३२,८४३ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,५८,७९२ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
       

राज्यात २२ मार्च ते १० मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,०३,३४५ गुन्हे नोंद झाले असून १९,६३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार ४९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
 या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २०७ घटना घडल्या. त्यात ७४७ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल 

 

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा


      नियंत्रण कक्षात  ८८ हजार कॉल 
     

पोलीस विभागातील नियंत्रण कक्षात १०० या नंबरवर  लॉकडाऊन काळात या फोनवर  ८८,६२३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे. अशा ६६२व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५८,७९२ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.
     

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५५,७८४ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत

Web Title: Coronavirus : Allotment of 3 lakh 32 thousand passes for essential services during lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.