मुंबई : मुंबईत शुक्रवारी दिवसभरात तब्बल २१८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र शुक्रवारी दिवसभरात १३५४ नवीन रुग्ण आढळले असून ७३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ५२०२ इतकी आहे.महापालिकेच्या अहवालानुसार सध्या २२ हजार ७३८ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ६१ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या ७३ कोरोना रुग्णांपैकी ५८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील ५३ रुग्ण पुरुष आणि २० रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते.५५ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित १६ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते. शुक्रवारी दिवसभरात ९०५ रुग्णांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधितांचा आकडा ९० हजार १४९ एवढा आहे.
coronavirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ७३ जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 6:56 AM