Coronavirus : मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 08:18 PM2020-05-20T20:18:34+5:302020-05-20T20:22:09+5:30
Coronavirus : वाहतूक विभागतील पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५७ वर्षीय पोलीस हवालदार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे राहण्यास होते. तसेच मागील आठ दिवसापासून सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे बुधवारी निधन झाले. पार्क साईट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्पना पवार यांनी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. तसेच वाहतूक विभागतील पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या मृत्यूचा आकडा १० वर पोहचला आहे.
पोलीस दलातील कोरोनाग्रस्ताची संसर्ग वाढत असताना त्याला बळी पडणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. अलीकडेच मुंबई पोलीस दलातील एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मागच्या शनिवारी पहाटे या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचे वय अवघे 32 वर्षे होते.
शाहूनगर येथे कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने ताप व सर्दी असल्याने काही दिवसापासून आजारी रजा काढून प्रतीक्षानगरातील घरी आराम करीत होते. त्यांनी 13 मे रोजी सायन रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली होती. त्याचा अहवाल मिळाला नसलातरी कोरोना झाल्याच्या शक्यतेमुळे ते चिंतेत व अस्वस्थ होते. पहाटे पाचच्या सुमारास घरातील मंडळीना ते बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
CoronaVirus News: मुंबई पोलीस दलातील कोरोनाचा सातवा बळी; सहाय्यक निरीक्षकाचा मृत्यू
कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव
बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट
धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक
Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात