coronavirus: मुंबईत झाले अँटी मास्क आंदोलन, लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्याची मागणी

By बाळकृष्ण परब | Published: October 5, 2020 06:25 PM2020-10-05T18:25:31+5:302020-10-05T18:32:00+5:30

Anti-mask agitation in Mumbai News : मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये हे आंदोलन आयोजित झाले. यामध्ये मास्क वापरण्याची सक्ती हटवण्याची मागणी करत अनेकजण सहभागी झाले होते.

coronavirus: Anti-mask agitation in Mumbai, demand for complete withdrawal of lockdown | coronavirus: मुंबईत झाले अँटी मास्क आंदोलन, लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्याची मागणी

coronavirus: मुंबईत झाले अँटी मास्क आंदोलन, लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेण्याची मागणी

Next
ठळक मुद्देकोरोनाचा धोका कायम असला तरी लोकांमधील कोरोनाबाबचे गांभीर्य कमी होताना दिसत आहेआज मुंबईमध्ये काही तरुणांनी अँटी मास्क आंदोलन केलेआंदोलनकर्त्यांनी मास्कची सक्ती आणि लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची केली मागणी

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिग पाळण्याचे, मास्क घालण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र असे असले तरी लोकांमधील कोरोनाबाबचे गांभीर्य कमी होताना दिसत आहे. बरेच जण मास्कशिवाय फिरताना दिसतात. दरम्यान, आज मुंबईमध्ये काही तरुणांनी अँटी मास्क आंदोलन केले.

मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये हे आंदोलन आयोजित झाले. यामध्ये मास्क वापरण्याची सक्ती हटवण्याची मागणी करत अनेकजण सहभागी झाले होते. या तरुणांच्या हातात मास्क आणि लॉकडाऊनच्या विरोधातील घोषणा लिहिलेले पोस्टर्स घेऊन अनेक तरुण मरिन ड्राइव्ह येथे गोळा झाले होते. मास्कममुळे कॅन्सर होतो. तसेच सतत मास्क घालून श्वास घेता येत नाही, असा दावा या आंदोलनकर्त्यांकडून केला जात होता.


कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंधही पूर्णपणे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या तरुणांकडून करण्यात येत होती. आंदोलनादरम्यान, विविध मान्यवरांची विधाने असलेले पोस्टर घेऊन आंदोलनकर्ते मास्कची सक्ती हटवण्याची मागणी करत होते.

दरम्यान, राज्यात रविवारी १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण कोविडमुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे. राज्यात दिवसभरात १३ हजार ७०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ३२६ बळी गेले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ३८ हजार ८४ झाला.

सध्या २ लाख ५५ हजार २८१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात नवजात बालक ते १० वयोगटांतील ५२,४८६ बालकांना, तर ११ ते २० वयोगटांतील ९७,६०६ मुला-मुलींना कोरोनाची लागण झाली.

Web Title: coronavirus: Anti-mask agitation in Mumbai, demand for complete withdrawal of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.