Join us

CoronaVirus : नागरिकांच्या भटकण्यावर आता ड्रोनद्वारे चाप! गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर

By जमीर काझी | Published: April 05, 2020 1:17 PM

CoronaVirus : राज्यातील रेल्वे पोलीस आयुक्तालय वगळता सर्व १० आयुक्तालयांना विशेष ड्रोन पुरविण्यात आले आहेत.

 - जमीर काझी

मुंबई : कोरोनाचे राज्यातील  थैमान  नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असताना नागरिकांची मनमानी वर्तणूक त्यात अडसर ठरत आहे. विनाकारण रस्त्यावर जमावाने फिरणार्याचे प्रमाण कायम राहिल्याने करोनाबाधितांचा आकडा वाढत राहिला आहे. त्यांच्यावर  आता  ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करून चाप लावला जात आहे.

राज्यातील रेल्वे पोलीस आयुक्तालय वगळता सर्व १० आयुक्तालयांना विशेष ड्रोन पुरविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती अधिनियम व बंदी आदेश तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. राज्य पोलीस मुख्यालयाच्या  प्रशासन विभागाकडून  शुक्रवारी  ड्रोनचे १२ नग त्याच्या आवश्यक सामुग्रीसह  वितरित करण्यात आले अाहेत, कस्टम विभागाकडून ही अद्यावत सामुग्री मिळविण्यात आली असल्याचे  सांगण्यात आले.

कोरोनाच्या विषाणूला लगाम घालण्यासाठी राज्यासह देशात २३ मार्चपासून लाँकडाउन केले आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरीकांना घराबाहेर न पडण्यास मनाई केली आहे. तरीसुघ्दा अद्यापही काही प्रमाणात वाहनधारक व नागरिकांच्या ये-जा सुरूच आहैत. त्याशिवाय आपले मूळ गाव सोडून शहर व महानगरात नोकरी व अन्य कारणांनिमित्य स्थायिक झालेले नागरिकांनी आपल्या कुटुंबियासह गावाकडे मोर्चा वळविल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होण्यात अडचण येत आहे. त्यामुळे कोरोना बाधिताचा आलेख चढत  आहे. त्याला प्रतिबधासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे , सध्या आयुक्तालयांकडे उपलब्ध असलेल्या ड्रोनसह याचाही तात्काळ वापर करण्याचे आदेश  पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी त्याबाबत सर्व आयुक्तांना दिले आहेत.

ड्रोनवरून होणार चित्रण  जमावबंदी असतानाही अनेक ठिकाणी चौका,चौकात ,नाक्यावर तरूण एकत्र जमून गप्पाचा फड रंगवित आहेत,पोलिसांची गाडी दिसल्यानंतर ते घरात पळ काढतात, आता या अद्यावत ड्रोनच्या वापरामुळे त्याची ओळख स्पष्ट होणार असून त्याद्वारे  नियम मोडणाऱ्यावर  कारवाई  केली जाईल.- कृष्ण प्रकाश ( विशेष महानिरीक्षक, प्रशासन, पोलीस मुख्यालय  )

कोठे किती विशेष ड्रोनचे वाटपमुंबई व ठाणे आयुक्तालयाला प्रत्येकी दोन  ड्रोन देण्यात आलेले आहेत ,तर नागपूर ,पुणे ,नवी मुंबई ,पिपंरी-चिचवड, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर,अमरावती याठिकाणी प्रत्येकी एक ड्रोन पुरविण्यात  आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस