Join us

CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 9:57 AM

ठाकरे सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका प्रवक्त्यानं अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटानं राज्यभरात थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. ठाकरे सरकारकडूनही कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री शांत आणि संयमी भाषेत लोकांशी संवाद साधत असल्यानं त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटानं राज्यभरात थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. ठाकरे सरकारकडूनही कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं जनतेशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री शांत आणि संयमी भाषेत लोकांशी संवाद साधत असल्यानं त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण ठाकरे सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका प्रवक्त्यानं अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना हा एक आजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारतकी लडाई, शिवरायांचा महाराष्ट्र, लढवय्या महाराष्ट्र, या लढाईत लढणारे शूर सैनिक.... अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन:पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असंही रत्नाकर महाजन म्हणाले आहेत. 

विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात कायम अशा प्रकारचा उल्लेख करतात. मात्र सध्याचं वातावरणात काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची टीका केल्यानं विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल

CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस