Join us

coronavirus: जितेंद्र आव्हाड म्हणाले, "जिवंत राहण्याची शक्यता ३० टक्केच होती," पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:27 PM

सध्या विश्रांती घेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतरचा रुग्णालयातील अंगावर शहारे आणणारा अनुभव शेअर केला आहे.

ठळक मुद्देकोरोनावर मात केल्यानंतर आता माझी प्रकृती ठीक आहे.माझी पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर मी कोरोनाच्या जाळ्यात कसा अडकलो, रुग्णालयात कसा पोहोचलो आणि तिथे पुढचे काही दिवस काय झाले, हे मला माहित नाहीमी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या जिवंत राहण्याची शक्यता ३० टक्केच असल्याचे माझ्या मुलीला सांगितले

मुंबई/ठाणे - राज्य सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज नेते जितेंद्र आव्हाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आव्हाड आता कोरोनावर यशस्वीपणे मात करत घरी परतले आहेत. दरम्यान, सध्या विश्रांती घेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतरचा रुग्णालयातील अंगावर शहारे आणणारा अनुभव शेअर केला आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर आता माझी प्रकृती ठीक आहे. मला शिस्त लावण्यासाठी देवाने हे आजारपण दिलं असावं. कोरोनाबाबत आवश्यकती खबरदारी न घेतल्याने हे मला भोगावं लागलं, असे जितेंद्र आव्हाड यांनी बीबीसी मराठी या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

 आव्हाड पुढे म्हणाले की, माझी पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर मी कोरोनाच्या जाळ्यात कसा अडकलो, रुग्णालयात कसा पोहोचलो आणि तिथे पुढचे काही दिवस काय झाले, हे मला माहित नाही. माझ्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे पुढच्या तीन चार दिवसांत काय होत होतं याच्या आठवणी माझ्या स्मृतीमधून पुसल्या गेल्या आहेत.  

मी व्हेंटिलेटरवर होतो हेही खरे आहे. श्वास घ्यायला अडचण येत असल्याने मला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. मी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या जिवंत राहण्याची शक्यता ३० टक्केच असल्याचे माझ्या मुलीला सांगितले. त्यामुळे ती काही काळ हादरली. मात्र नंतर तिने सावरत परिस्थितीशी जुळवून घेतले, असेही आव्हाड यांनी पुढे सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा 

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल  

माझ्यासोबतच माझी पत्नीही कोरोनाबाधित असल्याने माझ्या प्रकृतीविषयी फारशी माहिती तिला देण्यात येत नव्हती. माझ्या प्रकृतीची माहिती कळल्यावर कुटुंबीयांना खूप त्रास होत असे. त्यामुळेच घरच्यांना फार माहिती न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घेतला होत, असे जितेंद्र आव्हाड यांनी पुढे सांगितले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजकारण