मुंबई : मुंबईकरांची दुसरी जीवन वाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमातील आतापर्यंत १६५८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ९० टक्के कर्मचारी बरे होऊन घरी परतले असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. दरम्यान, गेले दोन महिने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाºया ५५ वर्षीय दिलीप पायकुडे या बेस्ट कर्मचाºयाने अखेर कोरोनावर मात केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या. या कर्मचाºयांना आपल्या कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे, यासाठी दररोज कामावर हजर होणाºया बेस्ट कर्मचाºयांपैकी दिलीप पायकुडे एक होते. मात्र २७ जून रोजी त्यांना अचानक ताप येऊन श्वासनाचा त्रास सुरू झाला. काही तासांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
रुग्णालयात १७ दिवस व्हेंटिलेटरवर आणि ४३ दिवस आॅक्सिजनवर काढल्यानंतर पायकुडे यांनी कोरोनावर मात केलीे. बुधवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आता पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. आतापर्यंत बेस्टमधील ९० टक्के कर्मचारी बरे झाले आहेत. तसेच सध्या ११८ कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.रुग्णालयात १७ दिवस व्हेंटिलेटरवर आणि ४३ दिवस आॅक्सिजनवर काढल्यानंतर पायकुडे यांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.