coronavirus : बेस्टच्या प्रवासी संख्येत तीन टक्क्यांनी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 04:50 AM2020-03-15T04:50:29+5:302020-03-15T04:51:38+5:30
मुंबई : कोरोनाच्या भीतीने अनेक जण घरातूनच काम करत आहेत. प्रवास टाळत आहेत. याचा फटका बेस्ट उपक्रमलाही बसत असल्याचे ...
मुंबई : कोरोनाच्या भीतीने अनेक जण घरातूनच काम करत आहेत. प्रवास टाळत आहेत. याचा फटका बेस्ट उपक्रमलाही बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या प्रवासी संख्येत तीन टक्क्यांनी घट झाली आहे.
भाडेकपातीनंतर बेस्टची प्रवासी संख्या ३८ लाखांवर पोहोचली होती. मात्र, या आठवड्यांत यात घट झाली. सोमवारी एक लाख ३९ हजार, तर बुधवारी एक लाख २५ हजार प्रवासी संख्या घटल्याचे समोर आले आहे. २ मार्चला बेस्ट बसगाड्यांमधून ३२ लाख २७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, ९ मार्च रोजी ३० लाख ८८ हजार लोकांनी प्रवास केला, तर बुधवारी ४ मार्च रोजी ३२ लाख २२ हजार लोकांनी प्रवास केला होता. ही संख्या ११ मार्च रोजी ३० लाख ९७ हजार झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने प्रवासी संख्या कमी असते. मात्र, त्यातही गेल्या रविवारी ५७ हजार प्रवाशांची घट झाली आहे, असे स्पष्टीकरण बेस्ट उपक्रमाने दिले.