मुंबई : बस भाडेकपात केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांनी खचाखच भरणाऱ्या बेस्ट बसगाड्यांमधील गर्दी आता ओसरू लागली आहे. कोरोनाच्या धसक्याने बहुतांशी मुंबईकर प्रवास करणे टाळू लागले आहेत. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, खाजगी कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीमुळे प्रवासी संख्या ओसरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल दोन लाख प्रवासी कमी झाल्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मोठा फटका बसत आहे. जुलै २०१९ पासून बस भाडेकपात केल्यानंतर प्रवासी संख्या ३३ लाखांवर पोहोचली होती. मात्र या आठवड्यात प्रवासी संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जगभर थैमान घालणाºया कोरोनाचे आठ रुग्ण मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे मुंबईकर धास्तावले असून अनेकांनी घरी राहणे पसंत केले आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत. तर काही खाजगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा दिली आहे.सॅनिटायझरचे वाटपकोरोनाची लागण बेस्ट कर्मचा-यांना होऊ नये यासाठी सर्व बेस्ट बस, आगारांमधील कर्मचाºयांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, चालक व वाहकांना मास्क उपलब्ध करून देण्याची मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनच्या वतीने बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाºयांच्या पतपेढीमार्फत सध्या कर्मचाºयांना मास्क देण्यात येत आहेत.बसमधून उभ्याने प्रवास करण्यास मनाईयाचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर आणि उत्पन्नावर दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून प्रवासी संख्येत घट होऊ लागली आहे. त्यात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेस्ट बस गाड्यांमधून उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश बेस्ट प्रशासनाने सर्व बस आगार, बस वाहक आणि चालक यांना दिले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी घट होणार आहे.
Coronavirus : कोरोनाच्या भीतीने बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 4:51 AM