CoronaVirus : महाराष्ट्र आपत्कालीन निधीत मुंबईचे भाजपा नगरसेवक व आमदार एक महिन्याचे वेतन देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 09:01 AM2020-03-28T09:01:48+5:302020-03-28T09:02:59+5:30

कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत.

CoronaVirus : BJP corporators and MLAs of Mumbai will pay one month's salary in Maharashtra Emergency Fund vrd | CoronaVirus : महाराष्ट्र आपत्कालीन निधीत मुंबईचे भाजपा नगरसेवक व आमदार एक महिन्याचे वेतन देणार

CoronaVirus : महाराष्ट्र आपत्कालीन निधीत मुंबईचे भाजपा नगरसेवक व आमदार एक महिन्याचे वेतन देणार

Next

मुंबई. भारतीय जनता पार्टीचे मुंबईतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी महाराष्ट्र आपदा निधीमध्ये आपले एक महिन्याचे वेतन देतील. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा ह्यांनी शुक्रवारी ही घोषणा केली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत.

मुंबई भाजपा अध्यक्ष लोढा ह्यांनी एका पत्रकामध्ये माहिती दिली आहे की, जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या रोगराईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पक्षातील सर्व नगरसेवक आणि आमदार ह्यांना आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्र आपदा निधीमध्ये दान करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, त्याशिवाय सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा आपल्या पातळीवर सहकार्य करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा ह्यांच्या आवाहनानंतर लॉक डाउनमध्ये मुंबईमध्ये जेवणाची अडचण असलेल्या गरजू लोकांना भोजन उपलब्ध करण्यासाठीसुद्धा भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवत आहेत. स्वत: मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार लोढ़ा मुंबई व ठाण्यामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत.

मुंबईमध्ये पक्षाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी लोकांसाठी जेवणाची सोय करत आहेत. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देशाला एकत्र घेण्यासंदर्भात पंतप्रधानांचे कौतुक करताना म्हटले आहे की, जनतेला सोबत घेऊन जनतेच्या सुरक्षिततेसाठी जननेत्याद्वारे हे अतिशय महान कार्य केले जात आहे व त्यापासून सर्व जग धडा घेऊ शकेल.

Web Title: CoronaVirus : BJP corporators and MLAs of Mumbai will pay one month's salary in Maharashtra Emergency Fund vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.