Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 06:42 PM2020-05-25T18:42:15+5:302020-05-25T18:55:50+5:30

नारायण राणेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; ठाकरे सरकारवर शरसंधान

Coronavirus bjp mp narayan rane demands president rule in maharashtra kkg | Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

Coronavirus News: राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

Next

मुंबई: राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारमध्ये कोरोना संकट हाताळण्याची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी राणेंनी राज्यपालांकडे केली. 



राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करू शकत नाही. या सरकारमध्ये तितकी क्षमता नाही. राज्यात आतापर्यंत हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. हे सरकार लोकांचे जीव वाचवू शकत नाही. कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असं नारायण राणेंनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्यानं त्यांना परिस्थिती हाताळता येत असल्याची टीकादेखील त्यांनी केली.



आतापर्यंत राज्याला जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. एका तोंडानं राज्य सरकार केंद्राचं कौतुक करतं. दुसऱ्या तोंडानं टीका करतं. हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे हे  समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना सुरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही, अशा शब्दांत राणेंनी सरकारला लक्ष्य केलं. राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात दिली तरच परिस्थिती सुधारेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

“खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या सोमय्यांवर आली 'ते' ट्विट डिलीट करायची वेळ

मी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार

Web Title: Coronavirus bjp mp narayan rane demands president rule in maharashtra kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.