CoronaVirus कोरोनाशी लढण्यासाठी 'वानखेडे' तत्काळ ताब्यात द्या; मुंबई महापालिकेचे एमसीएला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:23 PM2020-05-15T22:23:54+5:302020-05-15T22:26:43+5:30
मुंबईमध्ये पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमधील गलथान कारभाराचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. वाढत्या रुग्णांमुळे भविष्यातील गरज लक्षात घेता आता मुंबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडिअम वानखेडे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. मुंबईत जवळपास सव्वा लाखावर खाटा उपलब्ध केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. जूनपर्यंत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेनेही तयारी सुरु केली आहे. यासाठी आज वानखेडे स्टेडिअम पालिकेच्या ताब्यात देण्याचे पत्र पालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठविले आहे.
मुंबईमध्ये पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमधील गलथान कारभाराचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. वाढत्या रुग्णांमुळे भविष्यातील गरज लक्षात घेता आता मुंबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडिअम वानखेडे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Brihanmumbai Municipal Corporation has written to Mumbai Cricket Association to temporarily hand over the possession of Wankhede Stadium to BMC, for use by emergency staff of BMC and to quarantine #COVID19 positive but asymptomatic patients. pic.twitter.com/bSysIq1LgT
— ANI (@ANI) May 15, 2020
वानखेडे स्टेडिअममध्ये सरकारी कर्मचारी तसेच ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशननेही स्टेडिअम पालिकेकडे सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. एमसीएला पाठविलेल्या पत्रामध्ये ही सूचना करण्यात करण्यात आली आहे. ज्या प्रकारे हॉटेल, लॉज, कॉलेज, प्रदर्शन केंद्रांना ताब्यात घेतले जाते, त्याच पद्धतीने तत्काळ स्टेडिअम पालिकेच्या ताब्यात दिले जावे. हे स्टेडिअम क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus बापरे! देश हादरला; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चीनलाही टाकले मागे
CoronaVirus राज्यात नव्या रुग्णांची संख्या वाढतीच; मृतांचा आकडा १०६८ वर
EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ
सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार
शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन
Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली