मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत मुंबईतील रुग्णांची संख्या ९० च्या वर गेली आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये याची काळजी घेतली जात आहे. कोरोनामुळे राज्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असा आदेश काढला. यानंतर काही तासांतच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करुन महापालिका आयुक्तांनी आपले आदेश मागे घेतलेत अशी माहिती दिली. प्रविण परदेशी यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं होतं की, जर कोणी मृतदेह दफन करण्यासाठी आग्रह करत असेल तर त्यांना मुंबई क्षेत्राच्या बाहेर मृतदेह घेऊन जाण्याच्या अटीवर परवानगी द्यावी. मुंबईत ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जो कोणी या नियमाचे उल्लंघन करेल त्यांच्यावर आयपीसी १८८ कलमातंर्गत कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते.
वरळीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यानंतर दोन कॉलनीमध्ये सील करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण केलं जात आहे. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरुन सांगितले की, रात्री २ वाजल्यापासून कोळीवाडा आणि जनता कॉलनी परिसर सील करण्यात आला आहे. संक्रमण रोखण्यासाठी हे अभियान चालवण्यात येत आहे असं ते म्हणाले.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २२० पर्यंत पोहचला आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार सोमवारी मुंबईत ८, पुण्यात ५, नागपूर २ तर नाशिक, कोल्हापूर याठिकाणी प्रत्येकी १ कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. सोमवारी कोरोनामुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला त्यात पुणे आणि मुंबईतील रुग्णाचा समावेश आहे.तर देशात सोमवारी कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रुग्ण?, पाहा एका क्लिकवर...
तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'
...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध
...यावर भाजपाला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय?; शिवसेनेने घेतला समाचार
भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...