Coronavirus : ‘समुद्रात ठेवण्याची मुदत संपल्यावर जहाजावरील १३१ खलाशांना भारतात आणू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:31 AM2020-03-19T04:31:51+5:302020-03-19T04:32:08+5:30
गेले दोन दिवस ‘लोकमत’ने या खलाशांना भारतात लवकर परत आणा, असे वृत्त दिल्याचा हा सकारत्मक परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : सॅनफ्रान्सिकोच्या समुद्रात ‘ग्रॅण्ड प्रिंसेस क्रुझ’ या जहाजावर अडकलेल्या १३१ खलाशांना त्यांचा समुद्रातील कालावधी संपताच भारतात परत आणू, अशी ग्वाही केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून दिली आहे. या खात्याचे वरिष्ठ अधिकारी तरंजित सिंग संधू यांनी ही माहिती दिल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी दिली.
गेले दोन दिवस ‘लोकमत’ने या खलाशांना भारतात लवकर परत आणा, असे वृत्त दिल्याचा हा सकारत्मक परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने १३१ अडकलेल्या कर्मचारी वर्गास आश्वासन दिले की, या जहाजावरील सर्व चालकदल सदस्यांना आवश्यक मदत पुरविली जात आहे. त्यांना समुद्रात वेगळे ठेवण्याचा कालावधी संपल्यानंतर भारत सरकार त्यांच्या परतीची सोय करेल, अशी माहिती गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी दिली.