Join us

Coronavirus : समुद्रात ठेवण्याची मुदत संपल्यावर जहाजावरील 131 खलाशांना भारतात परत आणू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 2:29 PM

Coronavirus : कोरोनाच्या भीतीपायी भारतातील काही प्रवासी हे अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या समुद्रात अडकून पडले आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई- अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिकोच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या 131 खलाशांना भारतात परत आणू, अशी ठोस ग्वाही केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून दिली आहे. कोरोनाच्या भीतीपायी भारतातील काही प्रवासी हे अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या समुद्रात अडकून पडले आहेत. त्या प्रवाशांना भारतात परत आणू, असा विश्वास वरिष्ठ अधिकारी तरंजित सिंग संधू यांनी ट्विट करत ही माहिती दिल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी सांगितले.

गेली दोन दिवस लोकमतने या 131 खलाशांना भारतात लवकर परत आणा असे वृत्त दिल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. तर या बोटीवरील खलाशी एडलर रॉड्रिंक्स यांनी वॉचडॉग फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या या गंभीर समस्येला वाचा फोडल्याबद्धल त्यांनी सर्व 131 खलाशांच्यावतीने लोकमतचे जाहीर आभार मानल्याचे अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाने 131 अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले की, या जहाजावरील सर्व चालकदल सदस्यांना आवश्यक मदत पुरविली जाईक आणि त्यांना समुद्रात वेगळे ठेवण्याचा कालावधी संपल्यानंतर भारत सरकार त्यांच्या परतीची सोय करेल असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: बापरे! ...तर कोरोनामुळे अमेरिका, ब्रिटनमध्ये 27 लाख लोकांचा मृत्यू होणार?

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमेरिकामृत्यू