Join us

coronavirus: भायखळा, कुर्ला, अंधेरीत रुग्ण वाढले, एकूण रुग्णांच्या २० टक्के रुग्ण या विभागांमध्ये; महापालिकेसमोर आव्हान    

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:14 AM

मुंबईत वरळी कोळीवाड्यामध्ये सुरुवातील मोठ्या प्रमाणात  कोरोना बाधित सापडले होते. त्यांनतर वरळी, प्रभादेवी आणि धारावी या विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत गेला.

मुंबई : वरळी आणि धारावी येथेच नव्हे तर कुर्ला, अंधेरी आणि भायखळा या विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. मुंबईत आतापर्यंत १४ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी २० टक्के रुग्ण या तीन विभागांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे नव्याने हॉटस्पॉट बनत चाललेल्या या विभागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.मुंबईत वरळी कोळीवाड्यामध्ये सुरुवातील मोठ्या प्रमाणात  कोरोना बाधित सापडले होते. त्यांनतर वरळी, प्रभादेवी आणि धारावी या विभागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत गेला. तब्बल एक हजार रुग्ण जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी) आणि जी उत्तर (धारावी, माहीम, दादर) या विभागात आतापर्यंत सापडले आहेत. त्यापाठोपाठ आता ई विभाग (भायखळा, मुंबई सेंट्रल) मध्ये ९४५ रुग्ण ७७ मृत्यू, एक विभाग (कुर्ला, साकी नाका) ८०७ रुग्ण, ६१ मृत्यू आणि के पश्चिम विभागात (अंधेरी पश्चिम, वर्सोवा, जुहू, जोगेश्वरी) ७९२ रुग्ण ३० मृत्यूची नोंद झाली आहे.जुन्या इमारती आणि दाटीवाटीने उभ्या चाळी१भायखळा, कुर्ला आणि अंधेरी या विभागांमध्येही धारावी प्रमाणे दाट लोकवस्ती, जुन्या इमारती आणि चाळी आहेत. त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू आहे. मदनपुरा, माझगाव, नागपाडा या ई विभागातील परीसरांमध्ये म्हाडाच्या उपकर प्राप्त जुन्या इमारती आणि चाळी दाटीवाटीने उभ्या आहेत.२या विभागात वाढत्या रुग्ण संख्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गेल्या महिन्यात सहायक आयुक्तांची बदली करण्यात आली. मात्र या विभागात गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ४६६ वरून ९४५ वर पोहचली आहे. के पश्चिम आणि एल विभागातही झोपडपट्टी भागात दाट लोकवस्ती कोरोना प्रसार वाढण्यास कारणीभूत आहे. पालिकेच्या उपाययोजनाच्पालिका अधिकारी, पोलीस आणि स्थानिक लोक प्रतिनिधी, बिगर शासकीय संस्थेचे प्रतिनिधी यांना बाधित क्षेत्रा बाहेर तैनात करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात असल्याची खात्री करून घेण्यात येत आहे.च्ई विभागात दररोज सरासरी ३० ते ३२ रुग्ण सापडत असतात. त्यामुळे रुग्णांची फिव्हर स्क्रिनिग, घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि जास्तीजास्त लोकांची चाचणी केली जात आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई