कोरोनासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बहिष्कार घालू शकत नाही : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:24 AM2020-06-14T04:24:48+5:302020-06-14T04:25:03+5:30

कोरोनासंदर्भात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र ठेवण्यासंदर्भात पालघरच्या एका रहिवाशाने दाखल केलेली जनहित याचिका निकाली

coronavirus Can not boycott employees on corona duty says High Court | कोरोनासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बहिष्कार घालू शकत नाही : उच्च न्यायालय

कोरोनासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बहिष्कार घालू शकत नाही : उच्च न्यायालय

Next

मुंबई : कोणतीही भीती न बाळगता कोरोनासंदर्भात कर्तव्य बजावणाºया कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी ते रोज त्यांचे कर्तव्य बजावत आहेत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घालू नका, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

कोरोनासंदर्भात कर्तव्य बजावणाºया कर्मचाºयांना स्वतंत्र ठेवण्यासंदर्भात पालघरच्या एका रहिवाशाने दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढताना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अमजद सय्यद यांच्या खडपीठाने वरील मत व्यक्त केले.

पालघर ते मुंबई असा प्रवास करून अत्यावश्यक सेवा पुरविणाºया कर्मचाºयांना मुंबईतच राहण्याची सोय करावी, अशी मागणी करणारी याचिका पालघरचे रहिवासी चरण भट यांनी न्यायालयात दाखल केली. ती शुक्रवारी न्यायालयाने निकाली काढली. या कर्मचाºयांमुळे वसई, विरारसारख्या भागात कोरोनाचा फैलाव होत आहे आणि हीच स्थिती ठाणे व डोंबिवलीची आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

‘भीतीमुळे याचिकाकर्त्याने न्यायालयाची पायरी चढली. अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी संसर्गाचे वाहक आहेत, असा प्रचार याचिकाकर्ते करीत आहेत आणि मोठ्या संख्येने याचा सामान्यांमध्ये प्रचार होईल,’ अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली.

‘अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाºयांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे अपंगत्व आणण्याऐवजी आणि त्यांच्या घरापासून दूर करण्यापेक्षा त्यांना त्यांचे कर्तव्य भीती न बाळगता पार पाडण्यास प्रोत्साहित केले पाहिजे,’ असे न्यायालयाने म्हटले.

Web Title: coronavirus Can not boycott employees on corona duty says High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.