Join us

CoronaVirus: कोरोनाच्या आणखी किती लाटा येणार, सांगू शकत नाही; तात्याराव लहानेंनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 8:01 AM

CoronaVirus Second wave: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. काल देशात जवळपास ३.८ लाख कोरोना बाधित सापडले होते. हा आकडा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. राज्यातही ६० हजाराच्या आसपास आकडा आहे. मृतांचा आकडादेखील वाढला आहे.

देशात कोरोनाच्या (CoronaVirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. काल देशात जवळपास ३.८ लाख कोरोना बाधित सापडले होते. हा आकडा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. राज्यातही ६० हजाराच्या आसपास आकडा आहे. मृतांचा आकडादेखील वाढला आहे. यावर टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी यावर भाष्य केले आहे. (Cant Predict how many waves of corona will come in future: Tatyarao Lahane)

साथ रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असे लहाने म्हणाले. 

राज्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखांवर गेली असली तरीही सरकारने ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची योग्य व्यवस्था केलेली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला आदेश आहेत. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो कोरोनाबाधित असेल तर त्याचा मृत्यू कोरोनाबाधित म्हणूनच दाखविला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचे तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस