Coronavirus : मध्य रेल्वे मार्गावर १० लाख प्रवासी घटले, दोन दिवसांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:06 AM2020-03-19T07:06:22+5:302020-03-19T07:07:04+5:30

मध्य रेल्वे मार्गावरून १७ मार्च रोजी सुमारे ३९ लाख ७७ हजार ३२१ प्रवाशांनी प्रवास केला, तर १६ मार्च रोजी मध्य रेल्वे मार्गावरून सुमारे ४९ लाख ४१ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे सुमारे ९ लाख ६४ हजार २४३ रेल्वे प्रवासी घटले आहेत.

Coronavirus : Central Railway lost 10 lakh passengers in two Day | Coronavirus : मध्य रेल्वे मार्गावर १० लाख प्रवासी घटले, दोन दिवसांतील आकडेवारी

Coronavirus : मध्य रेल्वे मार्गावर १० लाख प्रवासी घटले, दोन दिवसांतील आकडेवारी

Next

- कुलदीप घायवट
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने अनेक जण घराबाहेर पडणे टाळत असून ‘वर्क फ्रॉम होम’ला पसंती देत आहेत. त्यामुळे १६ आणि १७ मार्च रोजी मध्य, तसेच पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार रेल्वेचे अनुक्रमे १० आणि ८ लाख रेल्वे प्रवासी घटले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरून १७ मार्च रोजी सुमारे ३९ लाख ७७ हजार ३२१ प्रवाशांनी प्रवास केला, तर १६ मार्च रोजी मध्य रेल्वे मार्गावरून सुमारे ४९ लाख ४१ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे सुमारे ९ लाख ६४ हजार २४३ रेल्वे प्रवासी घटले आहेत.
१७ मार्च रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरून सुमारे ३२ लाख ६० हजार ८७८ प्रवाशांनी प्रवास केला, तर १६ मार्च रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरून सुमारे ४० लाख ७५ हजार ७०५ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे सुमारे ८ लाख १४ हजार ८२७ रेल्वे प्रवासी घटले आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या ७० ते ७२ लाखांवर आली आहे. त्यामुळे दररोज सुमारे ५ ते ८ लाख प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलमध्ये गर्दी करू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते.

राज्यभरात एसटीच्या १४ हजार ३५० फे-या रद्द
कोरोना विषाणूमुळे एसटीला जोरदार फटका बसला आहे. राज्यभरातील एसटीच्या १४ हजार ३५० फेºया रद्द केल्या आहेत. परिणामी, एसटी महामंडळाचे राज्यभरातील एक कोटी ९५ लाखांचा उत्पन्न बुडाले आहे. १७ मार्च रोजी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद महामंडळातून धावणाºया शिवनेरीच्या ३४८ फेºया रद्द केल्या आहेत. या दिवशी शिवनेरीतून सुमारे २ हजार प्रवाशांनी प्रवास केला. परिणामी, ९ लाख ७५ हजार ८५६ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. १७ मार्च रोजी कोल्हापूर, सांगली, पुणे, धुळे या विभागातून सर्वाधिक फेºया रद्द केल्या आहेत. कोल्हापूर विभागातील १ हजार ६२५ फेºया, सांगली विभागातील १ हजार ४४४ फेºया, पुणे विभागातून १ हजार ६७ फेºया, धुळे विभागातून ८६८ फेºया रद्द केल्या.

Web Title: Coronavirus : Central Railway lost 10 lakh passengers in two Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.