Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:55 AM2020-04-27T10:55:41+5:302020-04-27T10:57:41+5:30

कंटेनमेंट झोनमध्ये डोर-टू-डोअर लक्ष ठेवलं जात आहे. तपासणीचे प्रमाण आणखी वाढविण्यात येईल असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.

Coronavirus: Central team's shocking prediction about mumbai 75000 Cases By 15 May pnm | Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईत गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढकोरोना प्रकरणातील दुप्पट दर १० दिवसांचा असावामुंबई महापालिकेकडून कंटेनमेंट झोनमध्ये डोर-टू-डोअर लक्ष ठेवलं जात आहे

मुंबई – कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या मुंबईकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमने शहरात १५ मे पर्यंत ७५ हजार कोरोना रुग्ण आढळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मे महिन्याचा तिसरा आठवडा मुंबईकरांसाठी मोठा आव्हानात्मक असणार आहे. तर मुंबई महापालिकेनेही या संकटाशी लढण्यासाठी तीन आक्रमक योजना बनवल्या आहेत.

याअंतर्गत कॉन्ट्रेक्ट ट्रेसिंगवर भर दिला जाणार आहे. विना लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड १९ केअर सेंटरसोबतच खासगी आणि सरकारी रुग्णालयात क्षमता वाढवण्यात येईल. सध्या मुंबईत गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हा दर ३.१ दिवस होता तर संपूर्ण देशात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर ९.१ दिवस होता. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या संख्येच्या आधारावर केंद्रीय टीमच्या अंदाजानुसार ७५ हजार रुग्णांपैकी ६३ हजार रुग्ण विना लक्षण असतील तर १२ हजार रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येतील.

संपर्क ट्रेसिंग आणि लक्ष ठेवणे आवश्यक

महानगरपालिकेमध्ये रुग्णालयाशी संबंधित बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमलेल्या विशेष प्रतिनियुक्त विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या की, दुप्पट होणाऱ्या रुग्णांची संख्या घटवणे हे महानगरपालिकेचे पहिले आव्हान आहे. कोरोना प्रकरणातील दुप्पट दर १० दिवसांचा असावा. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ४ ते ५ दिवसांपर्यंत पोहोचू नये हे महत्वाचे आहे. त्यासाठी मूलभूतपणे संपर्क ट्रेसिंग व लक्ष ठेवणे उपयुक्त ठरू शकते असं त्यांनी सांगितले.

तसेच कंटेनमेंट झोनमध्ये डोर-टू-डोअर लक्ष ठेवलं जात आहे. तपासणीचे प्रमाण आणखी वाढविण्यात येईल असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले. आम्हाला जितके पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील तितके विषाणूचा पराभव होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही सध्या ताप आणि एकापेक्षा अधिक आजार असलेल्या वृद्धांवर लक्ष केंद्रित करत आहोत असं मनिषा चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, नायर, सेव्हनहिल, कस्तुरबा आणि एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात तैनात वैद्यकीय पथके रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ७ हजार ५०० बेड स्वतंत्रपणे तयार केले गेले आहेत, त्यापैकी २५० बेड्स आयसीयूमध्ये आहेत. येत्या काही दिवसात बीएमसी येथे ५०० बेडची आणखी व्यवस्था करेल. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजारांच्या वर पोहचली आहे तर ३२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील एकट्या मुंबईत ५ हजार ४०७ कोरोना रुग्ण आढळले आहेत तर १९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या करवाढीच्या सल्ल्यामुळे मोदी सरकार संतप्त, दिले चौकशीचे आदेश

किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा

मूठभर तबलिगींसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दोषी ठरवणे अयोग्य - जावेद अख्तर

कोरोनामुळे महाराष्ट्रासह सहा राज्ये लॉकडाऊन वाढविण्यास सहमत?
 

Web Title: Coronavirus: Central team's shocking prediction about mumbai 75000 Cases By 15 May pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.