Join us

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'टिकटॉक'वर हिट; शॉर्ट व्हिडीओंवर लाईक्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 6:31 PM

लॉकडाऊनमुळे कोणतीही पत्रकार परिषद न घेता फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधतात

ठळक मुद्देसरकारकडून येणारे संदेश पाहण्यासाठीही समाज माध्यमांचाच वापर सर्वाधिकटिकटॉकच्या माध्यमातून जवळपास १ कोटी ७७ लाख युजर्सने मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ पाहिलेराजकीय व्यक्तींनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर केला

मुंबई – सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी युद्ध करत आहे. अनेक देशांना कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. भारतातही गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु राहणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व लोकांना घरातचं राहण्याचं आवाहन केले जात आहे. त्यामुळे विरंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर वाढल्याचा पाहायला मिळतं.

राज्यात मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाविरुद्ध लढाईत आपल्या सगळ्यांना घरातच राहून हे युद्ध जिंकायचं आहे. ही लढाई आपल्या सुरक्षेसाठी आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हे गरजेचे आहे. घरात राहून कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्येष्ठांची काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्रीसोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसतात. लॉकडाऊनमुळे कोणतीही पत्रकार परिषद न घेता फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतात.

सोशल डिस्टेंसिगचं तंतोतत पालन करण्याची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:पासून केली आहे. दर दोन दिवसांनी मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरुन संवाद साधतात. एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे उद्धव ठाकरे राज्यातील जनतेची काळजी घेत आहे अशाप्रकारे त्यांचे कौतुक केले जात आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि टिकटॉक या माध्यमात प्रसिद्ध झालेत. सध्या सोशल मीडियात टिकटॉकने तरुणाईवर भूरळ घातली आहे. सीएमओ महाराष्ट्र नावाच्या टिकटॉक अकाऊंटवर मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओच्या छोट्या क्लीप्क्स व्हायरल होत आहेत. 

टिकटॉकच्या माध्यमातून जवळपास १ कोटी ७७ लाख युजर्सने मुख्यमंत्र्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. कोविड-१९ कोरोना विषाणूच्या महायुद्धाशी आपल्यापैकी प्रत्येकजण या ना त्या पद्धतीने मुकाबला करतो आहे. लॉकडाऊनची बंधने काटेकोरपणे पाळतानाच सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रयत्नही सगळीकडेच कसोशीने होताना दिसत आहेत. मात्र घराच्या चार भिंतीत असतानाही लोकांच्या मदतीला धावून आलाय तो सोशल मीडिया. नातलगांपासून ते मित्रमंडळींपर्यंत गप्पागोष्टींसाठी आणि कामासाठीही समाज माध्यमांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे.

आता सरकारकडून येणारे संदेश पाहण्यासाठीही समाज माध्यमांचाच वापर सर्वाधिक होताना दिसत आहे. देशातल्या अनेक अतिमहत्त्वाच्या राजकीय व्यक्तींनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यातले एक प्रमुख नाव म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधण्यासाठी, तसेच जनतेला महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यासाठी, तसेच सामाजिक अंतर राखण्याबाबत टिकटॉक व्हिडीओचा वापर अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओला ५० लाखांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“सहकाऱ्याच्या नथीतून तीर मारणारे उद्योग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी बंद करावेत”

संपूर्ण राज्यात फक्त १२ कोरोना रुग्ण; तरीही लॉकडाऊन वाढवण्याची ‘या’ मुख्यमंत्र्यांची इच्छा

रिक्षा-टॅक्सी चालकांना महिन्याला ५ हजार द्या; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?

जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!

 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुख्यमंत्रीउद्धव ठाकरेसोशल मीडियाटिक-टॉक